AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश्वर उदानी हत्या: शॉर्ट फिल्मच्या नावे पॉर्न फिल्म बनवून अडकवायचं होतं!

मुंबई: मुंबईचे प्रख्यात हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा झाला आहे. 13 दिवसांच्या सखोल तपासानंतर अखेर या क्लीष्ट हत्याकांडाचे मास्टरमाईंड आता जगासमोर आले आहेत. जे हत्या करून इनोसेंट असल्यासारखे मिरवत होते. पण आता या कटातील सगळ्या गुन्हेगारांचं बिंग फुटलं आहे. मद-मस्तर, पैशांची लालसा, वासना आणि वाईट नियत यामुळे राजेश्वर यांची हत्या झाल्याचं जवळपास […]

राजेश्वर उदानी हत्या: शॉर्ट फिल्मच्या नावे पॉर्न फिल्म बनवून अडकवायचं होतं!
राजेश्वर उडानी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई: मुंबईचे प्रख्यात हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा झाला आहे. 13 दिवसांच्या सखोल तपासानंतर अखेर या क्लीष्ट हत्याकांडाचे मास्टरमाईंड आता जगासमोर आले आहेत. जे हत्या करून इनोसेंट असल्यासारखे मिरवत होते. पण आता या कटातील सगळ्या गुन्हेगारांचं बिंग फुटलं आहे. मद-मस्तर, पैशांची लालसा, वासना आणि वाईट नियत यामुळे राजेश्वर यांची हत्या झाल्याचं जवळपास उघड होत आहे.

बारबाला, निखत उर्फ झारा खान आणि ही तीची नातेवाईक शाहिस्ता खान उर्फ डॉली खान. डॉली खानच हत्येमागची सूत्रधार असल्याचा आरोप आहे. डॉली आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी पीए आरोपी सचिन पवार एकमेकांचे चांगले मित्र होते. डॉलीने निखतची ओळख सचिन पवारशी केली. सचिन पवारने निखत उर्फ झारा खानला हिरे व्यापारी राजेश्वर उडानीला भेटवलं आणि इथूनच राजेश्वर आणि झाराचा प्यारवाली लव्हस्टोरी सुरु झाली. दोघे एकमेकांना भेटायचे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांच्या गरजा पूर्ण करू लागले..

निखत उर्फ झारा खान खूपच सुंदर असल्याने तिला बॉलीवूडमध्ये सुपरस्टार बनायचं होतं. त्यासाठी सचिन पवार आणि राजेश्वरने झाराला एका शॉर्टफिल्मसाठी तिचं कास्टिंग केलं होते. या शॉर्टफिल्ममध्ये तीचं काम पाहून मग राजेश्वर तीला मोठ्या चित्रपटासाठी कास्टिंग करणार होता. तोच या शॉर्ट फिल्मचा फायनान्सर होता. पण दुसरीकडे सचिन पवार आणि दिनेश पवार हे दोघे राजेश्वर उडानीवर खार खात होते..

तारीख – 28 नोव्हेंबर 2018 वेळ – रात्री 8.30 वा ठिकाण – विक्रोळी, मुंबई

राजेश्वर चार तासांसाठी बाहेर जाऊन येतो, म्हणून आपल्या गाडीने निघाले. राजेश्वर विक्रोळी हायवेला पोहोचले. त्यांनी ट्रॅफिक पोलीस चौकीसमोर गाडी सोडली. इथे त्यांची भेट सचिन पवार, दिनेश पवार, महेश भोईर, प्रणीत भोईर, शाहिस्ता खान आणि बारगर्ल निखत उर्फ झारा खानसोबत झाली. हे सहा जण मग एकाच गाडीत बसले, आणि पनवेच्या दिशेनं निघाले ज्या गाडीत हे सहा जण बसले त्या गाडीची नंबर प्लेट दिनेश पवारने बदलली होती. गाडी पनवेल गेस्ट हाऊसला पोहोचली. बोललं जातंय, की याच गेस्ट हाऊसवर शॉर्ट फिल्मच्या नावाखाली आरोपी पॉर्न फिल्म तयार करणार होते. पॉर्न फिल्म तयार करून 10 कोटींसाठी ब्लॅकमेल करणार होते. पण त्यापूर्वी फ्रेंडशिप सेलिब्रेशनचा केक दिनेश पवारने राजेश्वर उदानीच्या तोंडावर मारला. एक किलोचा केक मारल्याने राजेश्वर उदानी भडकला, त्यांच्यात बाचाबाची झाली, आणि याच केकच्या आधारे 5 जणांनी राजेश्वरचा खून केला.

हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेह पनवेलच्या नेहरे परिसरात टाकून पळ काढला. सचिन पवारने देवोलीनासोबत गुवाहाटी गाठली, तर इतर आरोपींनी मुरूड गाठलं, तिथे आरोपी त्यांच्या एका मित्राच्या घरी थांबले होते. इथे ही बारबालासुद्धा होती. तर इतरांनी थेट मुंबई गाठून आपण काही केलंच नाही, या अविर्भावात राहायला सुरुवात केली. पण फोनकॉल आणि मिसिंग तक्रारीमुळे पोलिसांनी तापासाला सुरुवात केली, आणि एकामागोमाग हत्याकांडाचे तार जुळू लागले. पोलिसांनी या सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या सगळ्यांनी 10 कोटींच्या लालसोपोटी राजेश्वरचा घात केला. ब्लॅकमेल करून प्रत्येकी दीड कोटी हे आपआपसांत वाटून घेणार होते. पण त्यांचा कट फसला आणि हे सगळे आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी देवोलीनालासुद्धा क्लीनचीट दिली नाही. तिचीही सखोल चौकशी सुरु आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

संबंधित बातमी 

ज्वेलर्स उदानींच्या हत्येप्रकरणी मंत्री प्रकाश मेहतांचा माजी पीए अटकेत

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.