समीर वानखेडेंचा समीर दाऊद वानखेडे कसा झाला?; नवाब मलिक यांचं एक ट्विट आणि…

| Updated on: Oct 25, 2021 | 5:22 PM

समीर वानखेडे नक्की कोण? समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे?... समीर ज्ञानदेव वानखेडेंचा समीर दाऊद वानखेडे कधी झाला? असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. (Did Sameer Wankhede use fake caste certificate, asks NCP leader Nawab Malik)

समीर वानखेडेंचा समीर दाऊद वानखेडे कसा झाला?; नवाब मलिक यांचं एक ट्विट आणि...
Sameer Wankhede
Follow us on

मुंबई: समीर वानखेडे नक्की कोण? समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे?… समीर ज्ञानदेव वानखेडेंचा समीर दाऊद वानखेडे कधी झाला? असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आणि या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली.

मलिक यांचं ट्विट काय?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही त्यांनी शेअर केली आहेत. समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल मलिक यांनी केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

असं झालं धर्मांतर

समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा. समीर वानखेडेच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असंही मलिक म्हणाले.

समीर दाऊद वानखेडेनी अटक करू नये यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय. मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अस म्हटलं. पण एखादा प्रामाणिक अधिकारी असता तर समोर जाऊन चौकशी करा म्हटलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

धर्मांतर केलं नाही, पण सासू मुस्लिम होती

वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं होतं, असंही क्रांतीने सांगितले.

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेव वानखेडे?, खरं काय?; एक्सक्ल्यूझिव्ह कागदपत्रे फक्त ‘टीव्ही9’कडे

वडील हिंदू, आई मुस्लीम; मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका, समीर वानखेडेंचं आवाहन

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार का, वाचा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

(Did Sameer Wankhede use fake caste certificate, asks NCP leader Nawab Malik)