वडील हिंदू, आई मुस्लीम; मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका, समीर वानखेडेंचं आवाहन

माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हिंदू आहेत तर आई जहिदा मुस्लिम होती. आमचे धर्मनिरपेक्ष कुटुंब असून मला त्याचा अभिमान आहे. मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं आणि 2016 मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला, असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे

वडील हिंदू, आई मुस्लीम; मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका, समीर वानखेडेंचं आवाहन
sameer wankhede nawab malik
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 1:45 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाविषयी ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक माझ्या कुटुंबाची खाजगी माहिती सोशल मीडियावर पब्लिश करत असून आमची बदनामी होत आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी प्रेस नोट जारी करत केला आहे.

समीर वानखेडे काय म्हणतात?

“नवाब मलिक माझ्या कुटुंबाची खाजगी माहिती सोशल मीडियावर पब्लिश करत आहेत. माझे वडील स्टेट एक्साईज विभागात सिनिअर पीआय होते. ते 2007 मध्ये रिटायर्ड झाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हिंदू आहेत तर आई जहिदा मुस्लिम होती. आमचे धर्मनिरपेक्ष कुटुंब असून मला त्याचा अभिमान आहे. मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं आणि 2016 मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केलं” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

“माझ्या कुटुंबाची आणि माझ्याबद्दलची वैयक्तिक माहिती नवाब मलिक ट्विटरवर करत नाहक मानहानी करत आहेत. हे माझ्या कौटुंबिक गोपनीयतेचा भंग करणारे आहे. माझी, माझ्या कुटुंबाची, वडील आणि आईची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू दिसत आहे. नवाब मलिक यांचं मागच्या काही दिवसातील कृत्य माझ्या कुटुंबाला मानसिक आणि भावनिक त्रास देणार ठरतंय. कुठल्याही कारणाशिवाय नवाब मलिक हे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याने मला दुःख होतंय” अशा भावना वानखेडेंनी व्यक्त केल्या आहेत.

Sameer Wankhede First marriage Claim Answer

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. “पैचान कौन?” इतकंच लिहित वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे.

त्यानंतर “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही त्यांनी शेअर केली आहेत. मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा इथूनच सुरू झाला, असं म्हटलं आहे. मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असावं आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचं हे सर्टिफिकेट असावं असं सांगितलं जातं. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.

अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

समीर वानखेडे हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. क्रांती आणि समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर यांचे ‘कोंबडी पळाली’ हे जत्रा चित्रपटातील गाणं अत्यंत गाजले आहे. याशिवाय माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल यासारख्या अनेक सिनेमात त्या झळकल्या आहेत. कांकण या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेचं मराठी अभिनेत्रीशी लग्न मग पहिल्या लग्नाचा फोटो का फिरतोय?

समीर वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावलं, खात्यांतर्गत चौकशी होणार; प्रभाकर साईलचे आरोप भोवणार?

‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.