मनसे आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज यांच्या डोळ्याला दुखापत

मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे दोन पक्षांचे कार्यकर्ते आज एकमेकांविरोधात हाणामारी करत असल्याचं बघियला मिळालं. जोगेश्वरी पूर्वेत संबंधित प्रकार घडला (Dispute between MNS and Shivsena party workers in Mumbai).

मनसे आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज यांच्या डोळ्याला दुखापत
मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज आणि शिवसेना नगरसेवक प्रविण शिंदे

मुंबई : मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नेहमी शाब्दिक टीका-टीप्पणी होत असते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनेकवेळा ट्विटरवर शिवसेनेवर निशाणा साधल्याचं आपण बघितलं आहे. मनसेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेत घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप अनेकदा केलाय. त्यामुळे मनसे-शिवसेनेत नेहमी वाद सुरु असतो. मात्र, यांच्यातील वाद आता थेट हाणामारीवर उतरल्याचं समोर आलं आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे दोन्ही पक्ष आज एकमेकांविरोधात हाणामारी करत असल्याचं बघियला मिळत आहे. जोगेश्वरी पूर्वेत संबंधित प्रकार घडला आहे (Dispute between MNS and Shivsena party workers in Mumbai).

नेमकं काय घडलं?

जोगेश्वरी पूर्वेला प्रभाग 73 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराजवळ मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. त्यादरम्यान मनसेचे उपाध्यक्ष प्रविण मर्गज यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्याठिकाणी असलेल्या कंत्राटदाराला मनसेने विचारपूस केली. त्यादरम्यान त्याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे हे सुद्धा त्यांच्या साथीदारांसोबत पोहोचले. त्यावेळी दोन्ही पक्षामध्ये बाचाबाची सुरू झाली, त्याचे रूपांतर मारामारीमध्ये झाले.

मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत

या हाणामारीत मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिली आहे. या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पोलीस मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहेत (Dispute between MNS and Shivsena party workers in Mumbai).

मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा : ‘अहं ब्रह्मास्मि’चा थाट, संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्समधला तिवारी’; संदीप देशपांडेंचा हल्ला