5

60 हजार चौ. फूट एरिया, D Mart च्या दमानींना भुरळ पाडणारा 1000 कोटींचा ‘मधुकुंज’ आहे कसा?

या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, रामटेक, मेघदूत यासारखे व्हीआयपी बंगलेही याच परिसरात आहेत. (Dmart Radhakishan Damani Madhukunj Bungalow)

60 हजार चौ. फूट एरिया, D Mart च्या दमानींना भुरळ पाडणारा 1000 कोटींचा 'मधुकुंज' आहे कसा?
मधुकुंज बंगला, फोटो सौजन्य : विकीमॅपिया
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 9:53 AM

मुंबई : डी मार्टचे (D Mart) संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakrishnan Damani) यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल्समध्ये नारायण दाभोळकर मार्गावर हा आलिशान बंगला आहे. ‘मधुकुंज’ नावाचा हा बंगला दीड एकर जमिनीवर वसलेला आहे. तर 60 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त बिल्ट अप एरिया आहे. (Dmart Founder Radhakishan Damani who bought Madhukunj Bungalow at Malbar Hill costliest real estate deals in Mumbai)

90 वर्षांहून अधिक जुना

5752.22 चौरस मीटर क्षेत्रावर वसलेल्या ‘मधुकुंज’ बंगल्याची ग्राऊण्ड प्लस वन अर्थात एकमजली रचना आहे. हा बंगला 90 वर्षांहून अधिक जुना असल्याचा अंदाज बांधला जातो. नारायण दाभोळकर मार्गाच्या कोपऱ्यावर हा बंगला आहे. या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, रामटेक, मेघदूत यासारखे व्हीआयपी बंगलेही याच परिसरात आहेत.

मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद

‘मधुकुंज’ बंगल्याचे मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद यांचे कुटुंबीय आहेत. या व्यापारी कुटुंबानेच मुंबईला राजाबाई टॉवर भेट दिला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करणाऱ्या प्रेमचंद यांनी मातोश्री राजाबाईंचे नाव टॉवरला देण्याची अट घातली होती.

1.6 लाख प्रति चौरस फूट इतके मूल्य

या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते. दमानी यांनी गेल्या महिनात तीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी (3% दराने) भरली होती. या परिसरातील रहिवाशी संकुलात फ्लॅट्सची किंमत 70 ते 80 हजार प्रतिचौरस फुटाच्या घरात आहे. दमानींनी या बंगल्यासाठी 1.6 लाख प्रति चौरस फूट इतके मूल्य मोजल्याचे दिसते. (एक चौरस मीटर म्हणजे 10.76 चौरस फूट)

दमानी या वास्तूला रिडेव्हलप करुन टॉवर बांधणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे. या भागातील बहुतांश जमीनधारकांनी प्लॉट खरेदी करुन गगनचुंबी रहिवाशी इमारती बांधल्या आहेत. दमानी रिअल इस्टेट क्षेत्रातील आपली व्याप्ती वाढवण्याचा अंदाज आहे. नुकतंच त्यांनी ठाण्यात अडीचशे कोटी रुपयांना आठ एकर जमीन खरेदी केल्याचीही माहिती आहे.

फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India’s rich list of 2020) दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 12 हजार कोटी इतकी आहे.

राधाकिशन दमानी यांचा प्रवास

राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र एका आयडियाने त्यांचं आयुष्य बदललं. केवळ 24 तासात त्यांचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले.

राधाकिशन दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु केली. (Dmart Radhakishan Damani Madhukunj Bungalow)

वर्ष 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य 1.88 लाख कोटी रुपये आहे.

एका आयडियामुळे 1 लाख कोटीचे मालक

राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात 1980 च्या दशकात सुरु केली होती. मात्र त्यांची कंपनी D-Mart चा IPO 2017 मध्ये आला. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते. मात्र 21 मार्चच्या सकाळी जसं त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं दार ठोठावलं, तशी त्यांची संपत्ती 100 टक्क्यांनी वाढली.

21 मार्चला राधाकिशन दमानी यांच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला, त्यावेळी त्यांची संपत्ती अनेक श्रीमंत घराण्यांपेक्षा जास्त झाली. डी मार्टचा शेअर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला होता. त्याची पदार्पणाची किंमत 299 रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांना तब्बल 102 टक्के रिटर्न मिळाले. मागील 13 वर्षात लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही शेअर्सची किंमत इतकी वाढली नव्हती.

संबंधित बातम्या 

मुंबईत 1000 कोटीचं नवं घर खरेदी, एका आयडियाने रातोरात 1 लाख कोटी उभे केले, कोण आहेत राधाकिशन दमानी?

Business in India : घर बसल्या कमी बजेटमध्ये सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास आयडिया

(Dmart Founder Radhakishan Damani who bought Madhukunj Bungalow at Malbar Hill costliest real estate deals in Mumbai)

Non Stop LIVE Update
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
'हा केवळ कमिशनचा व्यवहार', आनंदाचा शिधावरून निशाणा, कुणाचा गंभीर आरोप?
अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण
अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीला का गैरहजर? छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण