मुंबईत 1000 कोटीचं नवं घर खरेदी, एका आयडियाने रातोरात 1 लाख कोटी उभे केले, कोण आहेत राधाकिशन दमानी?

Radhakishan Damani D Mart Founder : राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. (Radhakishan Damanis Rs 1,000 crore home) मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस फुटांचं हे अलिशान घर आहे.

मुंबईत 1000 कोटीचं नवं घर खरेदी, एका आयडियाने रातोरात 1 लाख कोटी उभे केले, कोण आहेत राधाकिशन दमानी?
Radhakishan Damani D Mart Founder
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 9:09 AM

कोलकाता : एक गुंतवणूकदार ते यशस्वी उद्योजक असा प्रवास असलेले डी मार्टचे (D Mart) राधाकिशन दमानी (D Marts Radhakrishnan Damani) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राधाकिशन दमानी यांनी मुंबईत तब्बल 1000 कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. (Radhakishan Damanis Rs 1,000 crore home) मुंबईतील पॉश एरिया असलेल्या मलबार हिल्समध्ये 5752.22 चौरस मीटरचं हे अलिशान घर आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केलं. या घराचं बाजार मूल्य 724 कोटी रुपये आहे. त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत 1 हजार कोटीच्या घरात जाते.

फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत (Forbes India’s rich list of 2020) दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 12 हजार कोटी इतकी आहे.

राधाकिशन दमानी यांचा प्रवास

राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र एका आयडियाने त्यांचं आयुष्य बदललं. केवळ 24 तासात त्यांचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढले.

राधाकिशन दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु केली.

वर्ष 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य 1.88 लाख कोटी रुपये आहे.

एका आयडियामुळे 1 लाख कोटीचे मालक

राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात 1980 च्या दशकात सुरु केली होती. मात्र त्यांची कंपनी D-Mart चा IPO 2017 मध्ये आला. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते. मात्र 21 मार्चच्या सकाळी जसं त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं दार ठोठावलं, तशी त्यांची संपत्ती 100 टक्क्यांनी वाढली.

21 मार्चला राधाकिशन दमानी यांच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला, त्यावेळी त्यांची संपत्ती अनेक श्रीमंत घराण्यांपेक्षा जास्त झाली. डी मार्टचा शेअर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला होता. त्याची पदार्पणाची किंमत 299 रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांना तब्बल 102 टक्के रिटर्न मिळाले. मागील 13 वर्षात लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही शेअर्सची किंमत इतकी वाढली नव्हती.

शेअर बाजारातून बंपर कमाई

राधाकिशन दमानी हे नेमही पांढऱ्या कपडे परिधान करतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ते ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून परिचीत आहेत. त्यांनी 1999 मध्ये रिटेल बिझनेस सुरु केला होता, त्यावेळी कुमार मंगल बिर्ला आणि फ्युचर ग्रुपचे किशोर बियानींची पावलं इकडे वळलीही नव्हती. राधाकिशन दमानींचा प्रमुख सल्ला म्हणजे, कोणत्याही कंपनीची नेहमी कर्जाची रक्कम तपासा, तसंच अल्पकाळासाठी पैसे गुंतवणे टाळा.

कोणत्याही एका क्षेत्राऐवजी, प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या शेअर्सवर लक्ष ठेवा. शेअर खरेदी करण्यापूर्वी ते कधी विकायचे हे आधीच ठरवा. बाजारात उतरण्यापूर्वी आपल्याला किती रक्कम गुंतवायची आहे, हे लक्षात ठेवा, असं दमानी सांगतात.

संबंधित बातम्या 

Business in India : घर बसल्या कमी बजेटमध्ये सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास आयडिया

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.