“क्लिनिक उघडण्याची सक्ती, मात्र विमा नाकारला” डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली.

"क्लिनिक उघडण्याची सक्ती, मात्र विमा नाकारला" डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : ‘कोव्हिड योद्धे’ म्हणून कोरोनाविरुद्धच्या संकटात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना विमा नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली. (Doctors Meet Raj Thackeray at Krishnakunja)

कोरोना काळात अडीच लाखांपेक्षा जास्त डॉक्टरांनी सेवा दिली. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली.

कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 147 डॉक्टरांचा या काळात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र सरकार याबाबत जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांनी राज ठाकरेंकडे साकडे घातले आहे.

याआधी जिम, धार्मिक स्थळ उघडण्यासाठी राज ठाकरे यांनी आवाज उठवला आहे, तर अतिरिक्त वीज बिलांविरोधातही मनसेने राज्यभर आवाज उठवला आहे.

संबंधित बातम्या :

‘अदानी ग्रुप’चे सीईओ ‘कृष्णकुंज’वर, वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंशी चर्चा

(Doctors Meet Raj Thackeray at Krishnakunja)

Published On - 9:03 am, Fri, 11 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI