AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच खळबळ, दावा तरी काय?

Sanjay Raut on Supreme Court : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयावर तोफ डागली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आज तर राऊतांनी, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका असा घणाघात केल्याने खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच खळबळ, दावा तरी काय?
सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल
| Updated on: Dec 07, 2024 | 11:01 AM
Share

खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयावर तोफ डागली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालय आणि निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांबाबत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक प्रकरणं मुद्दामहून रेंगाळण्यात आली अथवा वेळकाढूपणा करण्यात आल्याचा ठपका या पक्षांनी ठेवला आहे. त्यातच आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका असा घणाघात केल्याने खळबळ उडाली आहे. काय म्हणाले राऊत?

निवडणूक आयोगावर हल्लाबोल

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडी येथील गावकऱ्यांच्या धाडसाचं आणि त्यांच्या ईव्हीएमविरोधात बॅलेटवर मतदान घेण्याच्या निर्धाराचं राऊत यांनी कौतुक केले. त्यांनी नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांचे अभिनंदन केले. तर नाना पटोले, त्यांचे बंधु सुनील राऊत हे तिघे पण आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही मागणी या तिघांनी केली आहे. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे राऊत म्हणाले.

या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विद्यमान आमदारांनी केली आहे. राज्यभरातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. विरोधी पक्ष मागणी करत आहे. तरी निवडणूक आयोग डोळ्यावर झापडे घालून बसला की कानात गोळे घालून बसलेला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जनतेचा निवडून आलेला लोकांचा निकालावर विश्वास राहिलेला नाही. निवडणुका परत घ्या राजीनामा देतो असे महाविकास आघाडीचे आमदार म्हणत असल्याचे त्यांनी सांगीतले.

सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आणि कामकाजावर खरमरीत टीका केली. सर्वोच्च न्यायालयावरती फार विश्वास ठेवू नका, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. गेली साडेतीन चार वर्षे झालीत तरीही स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाही. आम्ही वारंवार निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टामध्ये याच्यासाठी लढा दिला. आता परत त्याच्यावर चर्चा सुरू केल्या आहेत.

साडेतीन-चार वर्षे या राज्यांमध्ये आमच्या 14 महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये लोकांचं राज्य नाही. तुम्ही काय आम्हाला न्याय देताय? चर्चा कसल्या करता, निकाल द्यायचा असेल तर तो आधी द्या. लेक्चर द्यायचे असेल तर दिल्ली विद्यापीठात आणि जेएनयूमध्ये जाऊन प्राध्यापकांची नोकरी करा, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...