टेनिस खेळताना पडून दुखापत, राज ठाकरेंच्या कंबरेवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?

टेनिस खेळताना पडून दुखापत, राज ठाकरेंच्या कंबरेवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?
राज ठाकरे, मनसे प्रमुख

राज ठाकरेंवर ऑपरेशन करणारे डॉ. जलील परकार यांनी शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. (Raj Thackeray waist operation)

अनिश बेंद्रे

|

Apr 11, 2021 | 1:54 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमरेजवळचा स्नायू दुखावला गेल्याने राज यांच्यावर शनिवारी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांच्यावर ऑपरेशन करणारे डॉ. जलील परकार यांनी शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. (Dr Jalil Parkar on MNS cheif Raj Thackeray waist operation at Lilavati Hospital)

राज ठाकरेंच्या कंबरेवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?

“राज ठाकरे यांना रोज टेनिस खेळायची सवय आहे. दीड महिन्यांपूर्वी टेनिस खेळताना ते पडले. त्यावेळी हातावर आणि कंबरेवर सर्व शरीराचे वजन आले. छोटे फ्रॅक्चर असल्याने हाताला प्लास्टर करण्यात आले होते. त्यामुळे ते चांगले झाले होते. पण कंबरेवर थोडे रक्त जमा झाले होते. ज्याला वैद्यकीय भाषेत हॅमेटोमा म्हणतो. तर त्याचे इन्फेक्शन वाढून पुढे त्रास वाढू नये यासाठी ते काढले” अशी माहिती डॉ. जलील परकार यांनी दिली.

राज ठाकरेंना आराम करण्याची सूचना

“राज ठाकरे यांच्यावर काल संध्याकाळी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. मी आणि डॉ. विनोद अगरवाल होते. तसंच राज ठाकरेंचे मित्र डॉ. आनंद उतुरे होते. आज राज ठाकरे यांना घरी पाठवण्यात आले. त्यांना अँटिबायोटिक घ्यावे लागतील. काही दिवस आराम करावा लागेल” असे डॉ. परकार यांनी सांगितले.

“मला ठाकरे कुटुंबाविषयी खूप आदर आहे. सध्या कोव्हिडचा काळ असल्याने संपूर्ण दिवस त्यातच जातो. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे खूप वेळ बसून बोलता नाही आलं. त्यांनी आराम करावा यासाठी जास्त डिस्टर्ब केलं नाही. काल संध्याकाळी त्यांचे कुटुंबीय सोबत होते. प्रकृती विचारपूस करण्यासाठी त्यांना कोणाचे फोन आले किंवा त्यांना कोण वैयक्तिक भेटायला आले होते का याची माहिती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी काही दिवसांपूर्वी संवाद साधला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसंच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते. परंतु शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते.

संबंधित बातम्या: 

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला अनुपस्थित

(Dr Jalil Parkar on MNS cheif Raj Thackeray waist operation at Lilavati Hospital)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें