मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आरोपाने खळबळ

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केला आहे (DSP rape woman subordinate)

मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आरोपाने खळबळ

मुंबई : मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर (deputy superintendent of police) बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 31 वर्षीय महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच (assistant police inspector) यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. (DSP booked for rape of 31 years old woman subordinate in Mumbai)

कनिष्ठ महिला सहकाऱ्याचा आरोप

आरोपीची ज्युनिअर अधिकारी म्हणून तक्रारदार महिला कार्यरत होती. मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असताना आरोपीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने केला आहे. आरोपी अधिकाऱ्याविरोधात कलम 376, 354 ड, 354 अंतर्गत मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या आमिषाने बलात्काराचा दावा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2019 या काळात हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

विवाहित असल्याचं पितळ उघडं

आरोपीने आपण विवाहित असल्याची माहिती आपल्यापासून लपवली होती. आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा दावा महिलेने केला आहे. लग्नाच्या भूलथापांना फसून त्यावेळी विवाहित असलेल्या तक्रारदार महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला.

आरोपीने अचानक टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने तक्रारदार महिलेने अधिक चौकशी केली, तेव्हा त्याची बनवाबनवी उघडकीस आली. आरोपी पोलीस हा विवाहित असल्याचं पितळ तिच्यासमोर उघडं पडलं. आरोपी पोलीस उपाधीक्षकाला अद्याप अटक झालेली नाही, त्याच्यावर विभागांतर्गत चौकशीही बसवण्यात आलेली नाही. (DSP booked for rape of 31 years old woman subordinate in Mumbai)

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी पोलिसांना लेखी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात ‘सत्यमेव जयते’

(DSP booked for rape of 31 years old woman subordinate in Mumbai)

Published On - 12:01 pm, Fri, 22 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI