AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक

ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका बसणारी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 17, 2024 | 10:09 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 17 जानेवारी 2024 : बीएमसी कथित खिचडी कोविड घोटाळ्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात. ठाकरे गटाच्या कालच्या महापत्रकार परिषदेलादेखील सुरज चव्हाण उपस्थित होते. ते आदित्य ठाकरे यांच्यासोबतच असतात. पण ईडीने त्यांना आज कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सुरज चव्हाण यांची याप्रकरणी याआधी चौकशी देखील झाली आहे. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

सुरज चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चौकशी केली जात होती. खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. नंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. ईडीनेसुद्धा त्यांची चौकशी केली होती. ईडीकडून अनेक तास ईडी कार्यालयात बसवून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी आधी मुंबई पोलिसांत सुरज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी आता ईडीने त्यांना अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

कोर्टात उद्या हजर केलं जाणार आणि…

सुरज चव्हाण यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी कोर्टात ईडीकडून सुरज चव्हाण यांची ईडी कोठडीची मागणी केली जाणार आहे. ईडीच्या वकिलांकडून कोर्टात काय-काय मुद्दे मांडले जातात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

‘उद्धव ठाकरेंना घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार’, सोमय्यांची टीका

सुरज चव्हाण यांना अटक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमेन सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. ईडीच्या या कारवाईचं मी स्वागत करत आहे. खासदार संजय राऊत मित्र परिवाराच्या खात्यातही खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या नेत्यांनी ऑक्सिजन खालं, रेमडेसिवीर, खिचडी खाल्ली, उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

‘सत्याचा विजय’, अमेय घोले यांचं ट्विट

सुरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर माजी नगरसेवक अमेय घोले यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ‘सत्याचा विजय’ असं ट्विट केलं आहे. अमेय घोले हे देखील आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. पण सुरज चव्हाण यांच्यामुळे अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच