VIDEO: दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो; राऊतांनी भाजपला डिवचलं

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (ED notice a love letter for political workers, says Shiv Sena leader Sanjay Raut)

VIDEO: दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो; राऊतांनी भाजपला डिवचलं
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 12:56 PM

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठीच मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो, अशा शब्दाच संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. (ED notice a love letter for political workers, says Shiv Sena leader Sanjay Raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. अनिल देशमुखही मुख्यंत्र्यांच्या शरद पवारसाहेबांच्या जवळचे होते. अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं सांगतानाच लव लेटर येत आहेत. सरकारला दोन वर्षे होत आहेत. सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. ‘दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो. दो साल से सर पटक रहे है, फिर भी दीवार टूटती नही. इतनी मजबूत दीवार है महाराष्ट्र सरकार की’. म्हणून त्यांनी लव लेटर पाठवलं. आम्ही त्याचं स्वागत करतो. कितीही पत्र काढा, आमचे लाखो शिवसैनिक तयार आहेत, असा इशारा राऊत यांनी दिला.

परब उत्तर देण्यास समर्थ

भाजपच्या नेत्यांना या या दिवशी अनिल परबांना चौकशीला बोलवणार हे कसं कळतं? किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कळतं… अजून दहा लोकांना महितीय… काय चाललंय? नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत, असं त्यांनी सांगितलं.

असे घाव खूप पचवलेत

आमच्या घरीही अशा नोटीस आल्या. परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्यापेक्षा ते शिवसैनिक आहेत. शिवसेना कमजोर होईल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांचा फायदा होईल असं होणार नाही. असे घाव आम्ही पचवले आहेत. आमची चिंता, अनिल परबांची चिंता अजिबात करू नका, असं सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांवर कायदेशीर झाली. या देशात कोणावरही होऊ शकते. जर एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता बेफाम वागली तर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावरही होऊ शकते. कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? असं नाही होतं. विशेषत: जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विशेष जबाबदारीने वागलं पाहिजे, असे टोलेही त्यांनी लगावले. (ED notice a love letter for political workers, says Shiv Sena leader Sanjay Raut)

संबंधित बातम्या:

अनिल परबच काय, अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, कितीही नोटिसा पाठवा : संजय राऊत

काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्यसंस्थांसह 10 विधानसभा लक्ष्य

(ED notice a love letter for political workers, says Shiv Sena leader Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.