AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Government : व्हीपच्या वादातून शिंदे सरकारची नय्या पार होणार? विरोधक म्हणतात घोडं अडणार…

पक्षफुटीसाठी लागणारी थेट फूट अद्याप पक्षात पडलेली नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच लागू होईल, तो व्हीप न मानणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा दावा सुनील प्रभूंच्या वतीने करण्यात आला आहे.

Eknath Shinde Government : व्हीपच्या वादातून शिंदे सरकारची नय्या पार होणार? विरोधक म्हणतात घोडं अडणार...
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 03, 2022 | 6:10 AM
Share

मुंबई– एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारची पहिलीच परीक्षा ठरणारे पहिले विशेष अधिवेशन आजपासून दोन दिवस मुंबईत पार पडणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker)निवड करण्यात येणार आहे. आता या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन व्हीप लागू होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आघाडीचे महाविकास उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप काढण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भारत गोगावले हेही शिंदे – फडणवीस सरकारचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करावे, असा व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही शिवसेनेच्या वादात कायदेशीरदृष्ट्या व्हीप नेमका कुणाचा लागू होँणार, हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाने अधिकृतरित्या काढलेला व्हीप पाळावाच लागेल, असे सांगितले आहे. जर व्हीप पक्षाच्या उमेदवारांनी पाळला नाही तर त्यांच्यावर अपत्राततेची कारवाई होऊ शकते. मात्र आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार, यावर सगळे ठरणार असल्याचे सांगितले जाते आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे काय म्हणणे?

शिवसेनेतून जरी ३९ आमदार फुटले असले तरी त्यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. एकनाथ शिंदे ज्यादिवशी सूरता गेले तयाचदिवशी त्यांचे विधिमंडळ गटनेते पद काढून घेण्यात आले होते आणि ते अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले. अधिकृत रित्या आता सुनील प्रभूंची नियुक्ती प्रतोदपदी केल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. तसेच राष्ट्रीय कार्याकारिणीतही सर्वांनी याबाबत कारवाईचे सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले आहेत. पक्षफुटीसाठी लागणारी थेट फूट अद्याप पक्षात पडलेली नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच लागू होईल, तो व्हीप न मानणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा दावा सुनील प्रभूंच्या वतीने करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

तर गोव्यात मुक्कामाला असलेल्या आमदरांना घेण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व्हीप आपल्याला लागू होत नाही, कारण दोन तृतियांश आमदार हे आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आज आपलाच विधानसभा अध्यक्षांचा उमेदवार निवडून येईल, असा दावा शिंदे यांनी गोवा विमानतळावर बोलताना केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

याबाबत शरद पवारांनी पक्षाचा व्हीप पाळावा लागत असल्याचे सांगितले. मात्र विधिमंडळातील पक्ष वेगळा आणि बाहेरचा पक्ष वेगळा असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष आता याबाबतचा निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी ही जबाबदारी उपाध्यक्ष नरहरी झिरवळांची असल्याचे सांगितले आहे. कायदेशीर कचाट्यात हा प्रश्न अडकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीने होणार

आज सभागृहात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने होणार आहे. आता सभागृहात जर यावर गुप्त मतदान झाले असते तर व्हीप बजावूनही काही उपयोग झाला नसता. मात्र आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड होणार आहे. अशा वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. त्यांनी सुरुवातीलाच यावर आक्षेप नोंदवला तर पुढे यात कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. सध्या तरी शिंदे-फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा दिसतो आहे. त्यामुळे आज सभागृहात काय घडेल, हा प्रश्न कायदेशीर कचाट्यात सापडेल का, याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.