AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या वकिलांचे सवाल, सुनील प्रभूंचे जवाब, विधानसभा अध्यक्षांसमोर जे घडलं ते जसंच्या तसं

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारत उलटतपासणी केली. पण सुनील प्रभू यांनीदेखील त्यावर मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

शिंदेंच्या वकिलांचे सवाल, सुनील प्रभूंचे जवाब, विधानसभा अध्यक्षांसमोर जे घडलं ते जसंच्या तसं
| Updated on: Nov 21, 2023 | 6:24 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा आज जबाब नोंदवण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यावर सुनील प्रभू यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासूनच्या विविध घडामोडींबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचादेखील उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या सर्व प्रश्नांवर सुनील प्रभू यांनी सविस्तर उत्तरे दिली.

प्रश्न आणि उत्तरं

महेश जेठमलानी – एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले होते त्यात भाजपने भ्रष्टाचार केला, गैरमार्गाचा वापर केला, असा आरोप तुम्ही कोणत्या आधारावर केला?

सुनील प्रभू- माध्यमांमध्ये दाखवलेल्या बातम्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांमधील चर्चा ऐकून मी ते वक्तव्य केले

जेठमलानी – तुम्ही अपात्रेसंदर्भात अनेक याचिका इंग्लिशमध्ये दाखल केल्या आहेत हे खरंय का?

सुनील प्रभू – होय. मी माझ्या वकिलांना सांगितलं त्यानुसार ड्राफ्ट तयार झाला, इंग्लिशमधला ड्राफ्ट मला वकिलांनी वाचून दाखवला. त्यानंतर मी सह्या केल्या.

जेठमलानी – तुम्ही याचिकेत असं कुठेही म्हटलं नाही की इंग्लिशमधला हा मजकूर तुम्हाला मराठीत वाचून दाखवण्यात आलाय, त्यावर काय म्हणणं आहे?

प्रभू – मी जे केलंय ते रेकॉर्डवर आहे आणि त्याला माझी सहमती आहे. वाचूनच मी सह्या केल्या आहेत.

जेठमलानी – अपात्रेतेची याचिका तुम्ही सही करण्यापूर्वी इंग्रजीमध्ये वाचून दाखवली होती का?

सुनील प्रभू – होय, वकिलांनी इंग्लिशमध्ये वाचून दाखवली, मी ती शब्दाश: मराठीत समजून घेतली आणि मग सही केली.

जेठमलानी – तुम्हाला कोणत्या वकिलांनी याचिका मराठीत समजावून सांगितली?

प्रभू यांचं उत्तर – असीम सरोदे यांनी मला समजावून सांगितलं

जेठमलानी – १८ नोव्हेंबर २०२३ ला जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय ते इंग्रजीमध्ये आहे हे सत्य आहे का?

प्रभू – रेकॉर्डवर आहे, मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. जवळपास 3 लाख लोकांनी मला निवडून दिलंय. मी अशिक्षित नाहीय. मला गोष्टी कळतात त्यानुसारच मी समजाऊन घेऊन सह्या केल्या.

जेठमलानी – तुम्ही २०१९ ला दिंडोशी मतदारसंघतून भाजप आणि सेनेची युती असताना निवडणूक लढवलात हे खरं आहे का?

प्रभू – मला शिवसेना पक्षाने ए फॉर्म आणि बी फॉर्म दिला आणि तिकीट दिलं. त्यानुसार मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून लढलो.

जेठमलानी – तुम्हाला तिकीट देण्यापूर्वी सेना भाजपाची युती होती हे माहिती आहे, सत्य आहे का ?

उत्तर – होय, सत्य आहे.

जेठमलानी- तुम्ही निवडणूक लढवताना विरोधात असणाऱ्या काँग्रेस तसेच इतर पक्षांवर आरोप केले होतेत का ?

प्रभू- मी विकासाची कामं केली होती. त्याच कामांच्या आधारे मी जनतेकडे मतं मागितली. त्यामुळे कोणावर टीका करायची माझ्यावर वेळ आली नाही

जेठमलानी – आपलं असं म्हणणं आहे का की २०१९ च्या प्रचारावेळी एनसीपी किंवा काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांवर टीका केली नाही ?

प्रभू – मी आधीच सांगितलंय की विकासाच्या मुद्यावर मी निवडणूक लढलो. मला कोणावरही राजकीय टीका करण्याची वेळ आली नाही.

जेठमलानी – प्रचारावेळी तुम्ही भाजप सेनेच्या युतीमुळे केलेल्या कामांचा उल्लेख केलात का?

प्रभू – मी केलेल्या कामाचा उल्लेख मी केला होता

जेठमलानी- प्रचारावेळी जे पोस्टर लावले होते त्यात मोदी-शहांचा फोटो होता का ?

प्रभू – त्यावेळी पोस्टर काय होते मला आठवत नाही. पण उद्भव ठाकरे यांचा फोटो पोस्टरवर होता हे मी सांगू शकतो.

जेठमलानी – आपण याचिकेत कशाच्या आधारे हा आरोप केला की भाजप हे भ्रष्ट हेतूने चुकीच्या प्रभावाने काम करत होते.

सुनील प्रभू – आम्ही २०१९ साली काँग्रेस-एनसीपीसोबत सरकार बनवलं. त्यात एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. मात्र विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दबावतंत्रात येऊन नियमबाह्य पद्धतीने वागले. भ्रष्ट मार्गाने भाजप वागली आणि म्हणून हे सगळं घडलं. या अनुषंगाने मी हे म्हटलं होतं.

जेठमलानी – या संदर्भात तुम्ही जे केलेलं वक्तव्य आहे ते फक्त मत आहे की तसा तुमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे?

प्रभू – मी ज्या पक्षाचा आमदार आहे आमच्या पक्षाचे अनेक आमदार पळून जात होते. त्यामुळे त्यांना कोणीतरी पळवून नेलं असावं, त्यांच्या मागे कोणीतरी असावं, असं बोललं जातं होतं म्हणून माध्यमांत चर्चा होती म्हणून मला जे वाटलं ते मी त्यात नमूद केले आहे.

जेठमलानी – तुमची उत्तर पाहता तुमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही असं दिसतय

प्रभू – माझ्याबाबतीत असं म्हणणं गैर आहे. मी सविधानांचा अपमान केलेला नाही, मी लोकशाहीचा आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.