AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंगजेबचा…, शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, आता वाद पेटण्याची शक्यता

Eknath Shinde Leader Controversy Statement : औरंगजेबाच्या कबरीसह राज्यात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूवरून सुद्धा राजकारण तापले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने मोठा वाद ओढावून घेतला आहे.

मातोश्रीवर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंगजेबचा..., शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, आता वाद पेटण्याची शक्यता
आता वाद पेटण्याची शक्यताImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 23, 2025 | 11:43 AM
Share

राज्यात गेल्या आठवड्यापासून औरंगजेबाची कबर, दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे एकच वाद उफाळण्याची शक्यता आहे. नेते संजय निरुपम यांनी माध्यमांशी संवाद साधताना वाद ओढावून घेतला आहे.

राऊतांचे वक्तव्य चुकीचे

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. भाजपाचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांना कोणीही कैद करून ठेवलेले नाही. अडवाणी यांचे वय आता 95 वर्षांपेक्षा अधिक आहे. ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. ते लोकसभेत अखेरपर्यंत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कॅबिनेट त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला जाते. त्यांना कोणीही कैद केले नसल्याचे संजय निरुपम म्हणाले.

लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र शासनातर्फे सर्व प्रकारची सुविधा दिल्या जाते. त्यांच्या भेटीगाठीसाठी त्यांच्या इच्छे प्रमाणे कोणीही जाऊ शकतो. त्यांना भेटू शकतो. संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी जे म्हटले आहे. ते चुकीचे आहे. त्यांनी हा आरोप मागे घ्यावा. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असा निरुपम म्हणाले.

निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान औरंगजेबाच्या मुद्दावर बोलताना संजय निरुपम यांचा ताबा सुटला. औरंगजेब हा आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी आराध्य देव झाल्याचा आरोप त्यांनी केला. तर लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ औरंजेबाचा फोटो मातोश्रीवर लागलेला दिसेल, असे वादग्रस्त वक्तव्य निरूपम यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने आता वाद उफाळण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

यावेळी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून निरुपम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या मुलाच्या हात दिशा सालियानचा हत्यामध्ये आहे, असे मला वाटतं, असे ते म्हणाले. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दिशा सालियानची वडिलांनी असा सांगितलेला आहे की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. म्हणजे कोणी वडील असं खोटे बोलू शकत नाही. सतीश सालियान यांची याचिका दाखल करून न्यायालयाने चौकशीचे आदेश देण्याची विनंती त्यांनी केली.

देशद्रोहींना कोणीही वाचवू शकणार नाही

यावेळी संजय निरूपम यांनी अजितदादांच्या कालच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी जे म्हटले आहे ते आम्हाला दुरुस्त करायचे आहे. देशभक्त आणि भारतीय असलेल्या मुस्लिमांवर आमचे कोणतेही आरोप नाहीत. पण दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि अजितदादाही त्याला वाचवू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया निरूपम यांनी दिली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.