AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध, कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये (Bengaluru) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Eknath Shinde : बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध, कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा
eknath shinde
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 9:15 AM
Share

मुंबई: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये (Bengaluru) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहेस, असंही ते म्हणाले.

कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बेळगावात अधिवेशनाचा घाट घालणाऱ्या कर्नाटकचा सरकारचा निषेध

कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. बंगळुरु मधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केलीय आहे.

महाराष्ट्र तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही

मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले.

इतर बातम्या:

NH48 | दिल्ली अब बहुत दूर नही ! मुंबई दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना

Amit Shah : अमित शाह आज सहकार पंढरीत, भाजपच्या दिग्गज नेत्यांची सहकार परिषदेला उपस्थिती

Eknath Shinde warns Karnataka Government over desecration of Chhatrapati Shivaji Maharaj statue in Bengaluru

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.