AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | …नाहीतर शरद पवारांना बसणार आणखीन एक झटका, निवडणूक आयोगाकडून दुपारी चारपर्यंतची डेडलाईन!

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाची मालकी शरद पवार यांच्याकडून काढून घेत अजित पवारांकडे देण्याचा निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला इतकाच नाहीतर आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला डेडलाईन दिलीये.

Sharad Pawar | ...नाहीतर शरद पवारांना बसणार आणखीन एक झटका, निवडणूक आयोगाकडून दुपारी चारपर्यंतची डेडलाईन!
शरद पवार
| Updated on: Feb 06, 2024 | 10:45 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये आता उलटफेर होणं काही नवीन राहिलं नाही. दोन वर्षात फुटलेल्या दुसऱ्या राष्ट्रवादी पक्षाची मालकी अजित पवारांकडे देण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि चिन्ह गेला आहे. इतंकच नाहीतर निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत शरद पवार गटाकडूने एक निर्णय घेण्यात आला नाहीतर त्यांंना आणखीन एक झटका बसणार आहे.

शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा म्हणजे राज्यसभा निवडणुकसाठी उद्या दुपारपर्यंत चार वाजता तीन नावं आणि चिन्ह देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जर उद्या म्हणजेच बुधवारी चार वाजेपर्यंत हे नाव नाही दिलं तर शरद पवार गट हा निवडणुकीत अपक्ष मानला जाणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाची पुढची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पक्षाचं नाव आणि चिन्ह

आमचं नवं आणि नवं नाव  हे शरद पवार आहेत. ज्या माणसाने हे बाळ जन्माला घातलं, संगोपण केलं, त्याला न्हाऊ घातलं. त्याला सुसंस्कृतपणा दिला ते सर्व ओढून घेतलं. त्याचं दुख होत नसेल का त्यांना. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनीच तटकरेंपासून अजित पवार यांना मंत्रीपद दिलं. कुणाच्या बळावर, पवारांच्याच जीवावर ना असं म्हणत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निर्णय देताना जो निकष लावला तोच निकष शरद पवार यांच्यासाठीही लावण्यात आला. ज्या गटाकडे जास्त आमदार, खासदार त्या गटाकडे पक्ष आणि चिन्ह असा हा निकष होता. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे जाणार याची कल्पना शरद पवार गटातील नेत्यांना होती. त्यामुळेच हे नेते अनपेक्षित निकाल नसल्याचे बोलत आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.