कृपाशंकर सिंह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार?

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (ex congress leader kripashankar singh will join bjp tomorrow)

कृपाशंकर सिंह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार?
kripashankar singh

मुंबई: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ex congress leader kripashankar singh will join bjp tomorrow)

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. मात्र, 2019मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात सामील झाले नव्हते. मात्र, त्यांनी या काळात भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी गणपतीलाही येत होते. यावरून सिंह यांनी भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचे कयास वर्तवले जात होते.

अखेर मुहूर्त मिळाला

मात्र, सिंह यांच्या भाजप प्रवेशाला आता मुहूर्त मिळाला आहे. उद्या त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पालिकेचं गणित बदलणार?

मुंबईत सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत कृपाशंकर सिंग?

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत. (ex congress leader kripashankar singh will join bjp tomorrow)

 

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच; फडणवीसांचा घणाघाती हल्ला

सरकारने हुकुमशाही करत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतले : प्रविण दरेकर

Monsoon Session Live Updates | भाजप आमदारांचे निलंबन रद्द करावे, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन

(ex congress leader kripashankar singh will join bjp tomorrow)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI