लोकसभेच्या रणधुमाळीत वीज महागली; आता 1 युनिटसाठी इतके दाम मोजा

Electricity Rate Hike : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील जनतेला मोठा झटका दिला. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर कमिशनने (MERC) 1 एप्रिल 2024 रोजीपासून वीजेच्या किंमतीत 10-20 टक्क्यांची वाढ केली. यापूर्वी नागरिकांना 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दराने रक्कम भरावी लागत होती. आता त्यात युनिटमागे इतकी वाढ झाली आहे.

लोकसभेच्या रणधुमाळीत वीज महागली; आता 1 युनिटसाठी इतके दाम मोजा
सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीचा शॉक
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 9:27 AM

देशभरात लोकसभा निवडणुकीचा हंगाम फुलला आहे. प्रचाराला, उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारने वीजेचा शॉक दिला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर कमिशनने (MERC) 1 एप्रिल 2024 रोजीपासून हा दरवाढ लागू केली. या नवीन दरवाढीमुळे आता वीजेच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरवाढीचा कोणताही परिणाम कमी उत्पन्न असलेल्या प्रवर्गावर पडणार नसल्याचा दावा केला आहे. एका युनिटमागे सर्वसामान्य ग्राहकांवर आता इतका बोजा पडणार आहे.

जनतेला दिला शॉक

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) 1 एप्रिल 2024 रोजीपासून दरवाढीवर अंमलबजावणीस मंजुरी दिली. वीजेच्या दरात 10-20 टक्क्यांची वाढ झाली आहे. MERC ने जाहीर केलेल्या टेरिफ योजनेनुसार, यापूर्वी सर्वसामान्य नागरिकाला 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दराने बिल येत होते. आता त्याला 5.88 रुपये प्रति युनिटने बिल अदा करावे लागणार आहे. ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे जादा मोजावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रति युनिट किती पडेल फरक

  1. 101-300 युनिटसाठी ग्राहकांना 11 रुपये 46 पैसे, 301-500 युनिटसाठी आता 15 रुपये, तर 500 युनिटपेक्षा अधिकच्या बिलासाठी ग्राहकांना 17 रुपये 81 पैसे द्यावे लागतील. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमईआरसीच्या निर्णयाचा कमी उत्पन्न गटातील नागरिकांवर परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
  2. आता ग्राहकांना 5.58 रुपयांऐवजी 5.88 रुपये प्रति युनिट दराने बिल अदा करावे लागणार आहे. प्रति युनिट 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार, 101-300 युनिटसाठी ग्राहकांना आता 11 रुपये 46 पैसे द्यावे लागतील. तर 500 युनिटपेक्षा अधिकचा वापर असेल तर प्रति युनिट ग्राहकांच्या खिशावर 17 रुपये 81 पैशांचा बोजा पडेल.
  3. ऐन उन्हाळ्यात दरवाढ झाल्याने ग्राहकांना घामटा फुटला आहे. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे एसी, कूलरचा वापर वाढला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे. मे आणि जून महिन्याच्या बिलाने ग्राहकांचे डोळे पांढरे होतील. या दिवसात उकाड्यामुळे हैराण लोकांना फॅन, एसी, कूलर सुरु ठेवावे लागतेच. रात्रंदिवस जरी ही उपकरणं सुरु ठेवली तर उकाड्यापासून थोडा बहुत दिलासा मिळतो. या दरवाढीमुळे वीजेच्या बिलात मात्र मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.