Jitendra Awhad : आधी हम दो, हमारे 11 वर बोला, मनुस्मृती जाळून दाखवा; जितेंद्र आव्हाड यांचं मुश्रीफ यांना आव्हान

Jitendra Awhad on Hasan Mushrif : मनुस्मृतीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यातील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काहींनी आव्हाडांवर टीका केली आहे. आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी आधी मनुस्मृती जाळून दाखवावी असे आव्हान आव्हाडांनी दिले आहे.

Jitendra Awhad : आधी हम दो, हमारे 11 वर बोला, मनुस्मृती जाळून दाखवा; जितेंद्र आव्हाड यांचं मुश्रीफ यांना आव्हान
आव्हाडांचा मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 3:31 PM

मनुस्मृतीप्रकरणाने राज्यातील अवघे राजकारण ढवळून निघाले आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याची चर्चा होताच त्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर महाड येथे जाऊन मनुस्मृती जाळली. पण त्यावेळी वाद त्यांच्या अंगलट आला. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीला तीव्र विरोध करत आव्हाडांची पाठराखण केली. तर आरोग्य शिक्षण मंत्री मुश्रीफांनी आणि भाजप गोटातील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. आता जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे.

हम दो हमारे 11 वर मुश्रीफांनी बोलावं

आधी हसन मुश्रीफ यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी.ते पुरोगामी म्हणता तर मनुस्मृतीवर आधी बोला.हम दो हमारे 11 यावर मुश्रीफ यांनी आधी बोलून दाखवावं असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी मुश्रीफांना दिले आहे. त्यामुळे आता हा वाद अजून पेटण्याची चिन्हं आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते मुश्रीफ

मनुस्मृतीचे दहन करायचे होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला होता.जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जनतेचा अपमान केला आहे. केवळ माफी मागून होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना अद्दल घडवण्याची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली होती.

हा विचारांचा प्रश्न

हा विचारांचा प्रश्न आहे. भुजबळ यांनी स्पष्ट सांगितल की ते अनवधानाने घडलं. मनुस्मृती जाळणं हा उद्देश होता, हे त्यांनी सांगितलं. भुजबळांनी पाठराखण केल्याबद्दल आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली. भुजबळांनी मनुस्मृतीला विरोध करत याप्रकरणात आव्हाडांची पाठराखण केली होती.

मुश्रीफांना असा इशारा

पुण्यातील पोर्श कार प्रकरणात जितेंद्र आव्हाड पुण्यात येणार आहेत. रवींद्र धांगेकर यांनी सगळ्यांना घेरून टाकलं आहे. तावरे यांना कोणी आणलं हे वेगळं सांगायला नको, असा टोला त्यांनी लगावला. मी तर माफी मागितली लगेच. पण आपण कोणाला सोडत नाही, असा इशारा ही त्यांनी दिला. हा रोख मुश्रीफांकडे होता का अशी चर्चा आता रंगली आहे.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….