AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त उडणारे कोसळले, ‘सामना’तून भाजपवर तिखट वार

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपवर तुफानी हल्ला केला आहे. मुखपत्र ‘सामना’तून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘चार राज्यांत भाजपमुक्त, जास्त उडणारे कोसळले’, या मधळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभांचा निकाल जाहीर झाला. यापैकी राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यात भाजपची सत्ता होती, ती काँग्रेसने हिसकावली. […]

जास्त उडणारे कोसळले, 'सामना'तून भाजपवर तिखट वार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपवर तुफानी हल्ला केला आहे. मुखपत्र ‘सामना’तून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘चार राज्यांत भाजपमुक्त, जास्त उडणारे कोसळले’, या मधळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभांचा निकाल जाहीर झाला. यापैकी राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यात भाजपची सत्ता होती, ती काँग्रेसने हिसकावली. तर तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांचीच सत्ता आली, तिथे भाजप काँग्रेसच्याही खाली राहिली. त्यामुळे भाजप चार राज्यातून मुक्त झाली असं सामनामध्ये म्हटलं आहे.

हिंदी पट्ट्यातील तीनही राज्ये भाजपने गमावली. त्यामुळे मोदी-शाहांच्या काँग्रेसमुक्त भारतच्या स्वप्नाची धूळधाण झालीच, मात्र भाजपशासित राज्यात भाजपचा पराभव म्हणजे जनतेनेच भाजपमुक्तीचा संदेश दिल्याचं ‘सामना’त म्हटलं आहे.

जनतेने हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवलं, पर्यायाच्या शोधात न फसता जे नको ते मुळापासून उखडून टाकलं, असं सामनामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सामनामध्ये काय म्हटलं आहे?

पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी ‘मेरिट’ म्हणजे गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला आहे. मोदी यांचा उदय आणि  भाजपची विजय यात्रा ज्या राज्यांतून सुरु झाली तेथेच भाजपच्या रथाची चाके रुतली.

मोदी पंतप्रधान असतानाच चार राज्यांत भाजपला ‘जबर’ फटका बसला आहे. यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान हे तर भाजपचे अभेद्य गड होते व या गडांना असे खिंडार पडेल असे कुणाला वाटले नव्हते.

थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही. राजस्थानात शेतकरी अडचणीत आहे. मध्य प्रदेशात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या गेल्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफी मागितली, पण शेतकऱ्यांनी शेवटी मतपेटीतून सूड घेतला. नोटाबंदीसारख्या भंपक निर्णयाने अर्थव्यवस्था कोसळली. लोकांचे रोजगार गेले आणि महागाई वाढली. जनता होरपळत असताना आमचे पंतप्रधान जगाचे राजकारण करीत ‘उडत’ राहिले. लोकशाहीत पैसा, ईव्हीएम घोटाळा, दहशतवादाची पर्वा न करता जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले, असं सामनात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

काँग्रेसने मध्य प्रदेशातही भाजपला मागे टाकलं, तीन राज्य हिसकावून घेतली!  

पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया  

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे  

‘घमेंडी’च्या विरोधात मतदारांची ‘मुसंडी’ : राज ठाकरे  

पाच राज्यांच्या निकालानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस 

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.