AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना

सेफ्टी दरवाजा आणि लोखंडी ग्रीलमध्ये अडकून पाच वर्षीय मुलाचा चिरडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. (Five Years Boy Died due to crushed in an elevator At Dharavi)

लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना
| Updated on: Nov 29, 2020 | 10:44 AM
Share

मुंबई : लिफ्टच्या बाहेर येताना सेफ्टी दरवाजा आणि लोखंडी ग्रीलमध्ये अडकून पाच वर्षीय मुलाचा चिरडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही नुकतंच समोर आला आहे. (Five Years Boy Died due to crushed in an elevator At Dharavi)

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील पालवाडी येथील कोझी शेल्टर या नावाची 7 माळ्याची बिल्डींग आहे. या बिल्डींगमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारा मोहम्मद शेख हा त्याच्या दोन बहिणींसह घरी जात होता. त्या तिघांनी ग्राऊंड फ्लोअरवरुन चौथ्या मजल्यावरील घरी जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला.

लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणींनी लोखंडी ग्रील सरकवत लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून लिफ्टबाहेर पडल्या. मात्र त्यावेळी लोखंडी ग्रील बंद करत असल्याने मोहम्मदला बाहेर जाता आले नाही. त्यामुळे लिफ्टचा लाकडी सेफ्टी दरवाजा बंद झाला.

त्यानंतर लिफ्ट सुरु झाल्याने लिफ्टची लोखंडी ग्रील आणि लाकडी दरवाज्यामध्ये अडकल्याने तो चिरडला गेला. यामुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर शाहूनगर पोलीस स्टेशनतर्फे मुलांना लिफ्टमधून एकटे सोडू नका असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही बिल्डींगमधील रहिवाशी आणि पालक तसेच परिसरातील लिफ्ट असलेल्या अन्य बिल्डिंगमध्येही खबरदारी घेण्यात यावी. लिफ्टमध्ये मुलांना एकटे सोडू नये तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टचा वापर करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगावणे यांनी केले आहे. (Five Years Boy Died due to crushed in an elevator At Dharavi)

संबंधित बातम्या : 

लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची तयारी, मुंबईत कोणती जागा निश्चित?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.