AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठी खळबळ! नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, काँग्रेस नेत्यासह जावयावर गुन्हा दाखल

एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका नगरसेविकेने महिलेचे अपहरण करुन तिला खोलीत बंद करुन ठेवले होते. महिलेची सुटका होताच तिने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया...

राजकारणात मोठी खळबळ! नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, काँग्रेस नेत्यासह जावयावर गुन्हा दाखल
भांडुप नगरसेविकाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 17, 2026 | 10:36 AM
Share

मुंबईतून एकल धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भांडुपमधील नगरसेविकेने एका महिलेचे अपहरण केले. इतकेच नाही तर तिला मारहाण करुन एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आता ही नगरसेविका कोण आहे? नेमकं प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर…

मुंबईतील भांडुप परिसर या खळबळजनक घटनेमुळे चर्चेत आला आहे. भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा कोपरकर या मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. एका महिलेचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा आणि जबर मारहाण केल्याचा आरोप कोपरकर कुटुंबावर करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नगरसेविका आशा कोपरकर यांचे पती सुरेश कोपरकर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय कोपरकर कुटुंबीयांना होता. याच संशयातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयाचे भूत डोक्यात घेऊन नगरसेविका आणि त्यांच्या मुलांनी मिळून हा कट रचला.

अपहरण आणि अमानुष मारहाण

आरोपींनी पीडित महिलेला तिच्या घरातून बळजबरीने उचलले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तिथे नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई आणि मुलाने मिळून पीडितेवर प्रश्नांचा भडीमार करत तिला अमानुषपणे मारहाण केली. केवळ मारहाण करूनच हे कुटुंब थांबले नाही, तर या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची गंभीर धमकीही त्यांनी महिलेला दिली. या संपूर्ण गुन्ह्यात कोपरकर कुटुंबाच्या खाजगी चालकानेही (ड्रायव्हर) त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

पीडित महिलेने या भयानक प्रसंगातून सुटका झाल्यानंतर थेट भांडुप पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेत भांडुप पोलिसांनी माजी नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि त्यांचा चालक अशा सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अपहरण, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि धमकावणे या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

भांडुप परिसरामध्ये सुरेश कोपरकर आणि आशा कोपरकर यांचे मोठे राजकीय वजन आहे. एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्यांवर थेट अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे काँग्रेस पक्षालाही स्थानिक पातळीवर रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?