Ganesh Festival 2022: फक्त याच वर्षी ‘पोओपी’च्या मूर्तींना परवानगी, नैसर्गिक जलाशयात मूर्तीविसर्जनास बंदी,कृत्रिम तलावांचा पर्याय

मागणीनुसार केवळ या वर्षासाठी 'पीओपी'च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असून मूर्तीच्या उंचीचेही बंधन ठेवण्यात आलेले नाही.

Ganesh Festival 2022: फक्त याच वर्षी 'पोओपी'च्या मूर्तींना परवानगी, नैसर्गिक जलाशयात मूर्तीविसर्जनास बंदी,कृत्रिम तलावांचा पर्याय
फक्त याच वर्षी 'पोओपी'च्या मूर्तींना परवानगीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 7:09 AM

मुंबई: गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय. पालिकेने गणेशोत्सवासाठी नियमावली (Rules and Regulations) जाहीर केली आहे. गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीनुसार केवळ या वर्षासाठी ‘पीओपी’च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असून मूर्तीच्या उंचीचेही बंधन ठेवण्यात आलेले नाही. मात्र ‘पीओपी’च्या मूर्तीचे (POP Idol) नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने नैसर्गिक जलाशय-तलाव आणि समुद्रात या मूर्तीच्या विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याचे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.

नैसर्गिक तलाव – जलाशय आणि समुद्रात विसर्जन करण्यास बंदी

मुंबईत या वर्षी ‘पोओपी’च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असली तरी घरगुती उत्सवातील ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींना नैसर्गिक तलाव – जलाशय आणि समुद्रात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘पीओपी’च्या मूर्तींवरच बंदी का घातली जाते?

  • ‘पीओपी’च्या मूर्तीवर रासायनिक रंगांचे लेपन असते. त्यामुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण झाल्याने जलचरांनाही धोका निर्माण होतो.
  • ‘पीओपी’च्या मूर्ती विरघळत नसल्याने या मूर्तीचा गाळ विहिरी, तलाव, जलाशयात साचून नैसर्गिक जिवंत झरे बंद होतात.
  • त्यामुळे गणेशोत्सवासाठी शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी न करता पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी कराव्यात.
  • घरगुती मूर्तीची उंची दोन फुटांची असावी. जेणेकरून पालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलावात विसर्जन करताना सोयिस्कर ठरेल.

2023 पासून ‘पीओपी’च्या मूर्तींना बंदी

या वर्षी मंडळांच्या मूर्तीना सूट मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये घरगुती मूर्ती सुमारे दोन फुटांपर्यंत उंचीच्या असतात, तर पालिकेच्या कृत्रिम तलावांत चार ते पाच फुटी गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा असते. मात्र मंडळांच्या मूर्ती दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असतात. त्यामुळे केवळ या वर्षासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नैसर्गिक जलाशय – तलाव, समुद्रात मूर्तीच्या विसर्जनाची परवानगी राहणार आहे. शिवाय 2023 पासून ‘पीओपी’च्या मूर्तींना बंदी राहणार असल्याचे पालिकेने याआधीच जाहीर केले आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.