
Sachin Ghaiwal Video : सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचाराची सभा घेण्यात आली होती. या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी सभेत सचिन घायवळ हा व्यासपीठावर असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी करून एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी या सभेचा एक व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवला. त्यामुळे याप्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असल्याचे दिसते.
काय म्हणाले रोहित पवार?
सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत सचिन घायवळ हा व्यासपीठावर होता. मी मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेत नाही. या सभेत राम शिंदे यांनी जी नावं दिली. ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषदेत जो कथित व्हिडिओ दाखवला त्यात सचिन घायवळ यांचे नाव घेतल्याचे समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचा सवाल
तर पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने अहिल्यानगरमधून अर्ज दिला. त्यावेळी तेव्हाच्या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी घायवळला पोलिसांनी पूर्णपणे क्लीन चिट दिली. घायवळवर कुठलाही गुन्हा नाही असा अहवाल सादर केला. त्यामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला. तो पळून जाऊ शकला. तेव्हा कुणाचा दबाव होता. निवडणुकीत त्यांनी कुणाचं काम केलं होतं. कुणाचा आशीर्वाद होता, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
दिल्लीत प्रश्न उपस्थित करणार
मुख्यमंत्र्याच्या जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं. कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात. फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे. इतकी सुरक्षा व्यवस्था असतांना त्यातून पासपोर्ट मिळू शकतो, इमिग्रेशन होत असताना डिजी यात्रेचं असताना धोकादायक आणि चिंताजनक आहे. चौकशी होईलच केंद्रीय मंत्री अमित शहा पर्यंत नेऊन चौकशी झाली पाहिजे. पासपोर्ट केंद्र सरकार देतात, हे त्यांना कळलं पाहिजे. महाराष्ट्रात किती धक्कादायक घटना झाली आहे, राज्याच्या सुरक्षेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुण्यात गुन्हेगारी वाढली
सरकारचा डेटा हा सांगतो महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यात त्यापेक्षाही जास्त गुन्हेगारीत वाढ झाली. पुणे शिक्षणाचा माहेरघर होतं.पुण्याचे लोकसंख्या वाढली सर्वात जास्त गुन्हे हा पुण्यात वाढले आहे. सातत्याने पुण्यामध्ये, याचे उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना विचारावा लागेल. महाराष्ट्राचे इकॉनॉमी आणि आर्थिक परिस्थिती डेटा सरकार सांगतोय, वर्ल्ड बँकचा डेटा सांगतो, भारत सर्वात जास्त कर्ज घेणारा देश आहे. राज्याची परिस्थिती वारंवार सरकारमध्ये मंत्री आहे. कॅबिनेट मंत्री आहे, म्हणतात आमचा निधी कट केला जातो याचा अर्थ परिस्थिती चिंताजनक आहे, अशी आरोपांची सरबत्ती सुप्रिया सुळे यांनी केली.