BJP : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी; इनकमिंगचा मुहूर्त साधला, कुणाला बसेल सर्वाधिक फटका?
Local Body Election BJP Planning : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे आता आयाराम-गयारामची बेरीज-वजाबाकी दिसून येईल. निवडणुकीपूर्वी काय घडणार घडामोडी?

Local Body Election BJP Planning : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. भाजपने ज्या ठिकाणी शक्य तिथे युती करण्याची भूमिका जाहीर केली आहे. विधानसभेत मॅजिक फिगर गाठणाऱ्या भाजपला मिनी मंत्रालयासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा हवा आहे. त्यादृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे म्हणतात. तसंच काहीसं धोरण भाजपने स्वीकारल्याचे दिसून येते. या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे आता आयाराम-गयारामची बेरीज-वजाबाकी दिसून येईल. निवडणुकीपूर्वी काय घडणार घडामोडी?
भाजपचे दरवाजे सताड उघडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारे खुली करण्यात आली आहे. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, त्यांना पक्षात घ्या. भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्या. कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असे आदेश दिले आहेत. मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपची रणनीती ठरली आहे. वसई विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे.
प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली बाबत अधिसूचना
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली बाबत अधिसूचना जारी करण्या आली आहे. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे. लवकरच प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत अधिसूचना जारी करून पालिकेला आदर्श कार्यप्रणाली नेमून देण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या १७ जागा
अनुसूचित जमातीच्या ०२ जागा
इतर मागासवर्गीयांच्या ६१ जागा यांचे महिला आणि पुरुष असे आरक्षण काढले जाईल
त्यानंतर उर्वरित सर्वसामान्य गटातील प्रभागाचे आधी महिला प्रवर्ग यांचे आरक्षण काढून उर्वरित सर्व प्रभाग खुला प्रभाग म्हणून जाहीर करण्यात येईल.
चक्राकार पद्धतीमुळे सध्या असलेले सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार आहे
तर दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येईल
महाविकास आघाडीच नाही तर मित्र पक्षांनाही खिंडार पडण्याची शक्यता आहे
