AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील जलवाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय, apollo बंदरात किती नवे धक्के तयार होणार?

रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. यात 10 नवी ठिकाणे बोटी थांबवण्यासाठी बनवण्यात येणार आहेत.

मुंबईतील जलवाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय, apollo बंदरात किती नवे धक्के तयार होणार?
जलवाहतुकीसाठी मोठा निर्णयImage Credit source: Mumbai city
| Updated on: Mar 22, 2022 | 8:47 PM
Share

मुंबई : सध्या गेट वे ऑफ इंडियावरून (Gate Way Of India) मोठी जलवाहतूक (Mumbai water travel) होत आहे. दिवसभारात हजारो बोटी इथे येतात. त्यामुळे या एकाच ठिकाणावर सध्या जास्त चाण येत (apollo)  आहे. तो ताण कमी करण्यासाठी सध्या वेगवान हलचाली सुरू आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. यात 10 नवी ठिकाणे बोटी थांबवण्यासाठी बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे या धक्क्यांवर एकाच वेळी तब्बल 20 बोटी उभ्या करता येणार आहेत. हा निर्णय मुंबईतील जलवाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरण्याची शक्यात आहे. कारण यामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराची वाहतूक क्षमतेते मोठी वाढ होणार आहे. आता लवकच या कामाला गती मिळू शकते.मुंबईकरांच्या जलप्रवासात मोठा मैलाचा दगड हा प्रकल्प ठरू शकतो.

जलवाहतुकीसाठी ऐतिहासिक निर्णय

दरवर्षी या ठिकाणाहून 26 लाख प्रवासी प्रवास करतात. येथे केवळ दोनच धक्के असल्याने प्रवाशांची गैरसैय तर होतेच आहे, मात्र धक्क्यांवर आणि बोटी चालवणाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली. सागरमाला प्रकल्पांतर्गत या धक्क्याच्या उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. 25, 116 चौ.मी. जागेवर धक्का विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पचा अंदाजे खर्चही 162 कोटी रुपयांच्या घरात आहे. यावरून हा किती मोठा प्रकल्प आहे. हे लक्षात येते. फेब्रुवारीमध्ये काढण्यात आलेली निविदा रद्द करून नवी निविदा काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीला पाठवला

यात प्रवासी निवारा, वाहनतळ आदी सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पार्किंगची समस्याही कमी होणार आहे. याच्या जून/जुलैमध्ये सुधारित निविदा निघण्याची दाट शक्यता आहे. तर काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन मंडळाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेगाने होऊ शकतो. गेट वे ऑफ इंडिया फक्त भारताचेच नाही तर जगाचे आकर्षण असणारे हे ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातील पर्यटक येतात. यावेळी अनेकजण बोटींच्या प्रवासाचा आनंद घेतात. मुंबईच्या पर्यटानात आणि जलवाहतुकीत ही जागा अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, त्यामुळे या जागेचा जलविकास होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. या कामचा प्रस्ताव सध्या केंद्राकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच कामाला सुरूवात होणार आहे.

ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?

Court on ST Strike : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कामगार कामावर का नाहीत? सदावर्तेंनी न सांगितलेले कोर्टाचे 5 सवाल

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.