VIDEO: आरक्षण न मिळण्यास पवारच कारणीभूत, सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही; पडळकरांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. (gopichand padalkar slams sharad pawar over maratha reservation)

VIDEO: आरक्षण न मिळण्यास पवारच कारणीभूत, सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही; पडळकरांचा हल्लाबोल
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 5:57 PM

राहुल झोरी, टीव्ही9 मराठी, मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्य सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही, असा दावा करतानाच आता बहुजन समाज या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. (gopichand padalkar slams sharad pawar over maratha reservation)

गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली जात आहे. आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असं पडळकर म्हणाले.

पवारांना पै पाव्हण्यांचं पडलंय

मराठा, ओबीसी आणि पदोन्नती या सर्व आरक्षणाला पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असं सांगतानाच ओबीसी आरक्षण रद्द होण्यास हे सरकारच जबाबदार आहे. या सरकारने अजूनही मागासवर्गीय आयोग गठीत केला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

वकिलांचेच सरकारवर आरोप

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत माहिती देत नाही, असं वकीलच सांगत होते. वकिलांनी कोर्टात सांगितलं. आम्ही तर बोललो नाही. महाराष्ट्र भाजप असो की केंद्र सरकार असो कुणीही हा आरोप केला नाही. हे वकिलाने कोर्टात सांगितलं. त्यामुळे सरकारची मानसिकता काय होती आणि आरक्षण कसं गेलं हे स्पष्ट होतं, असं ते म्हणाले.

अजित पवार अध्यक्ष कसे?

मराठा आरक्षणापाठोपाठ पदोन्नतीतील आरक्षणाचंही हेच झालं. या उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. मुळात अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष होऊच कसे शकतात? असा सवालही त्यांनी केला. पवार अध्यक्ष असल्याने या समितीत बाकीचे कुणीही बोलूही शकत नाही. काँग्रसेला तर या समितीत कुत्रंही भीक घालत नाही, हे काय सांगायची गरज आहे का?, असंही ते म्हणाले. (gopichand padalkar slams sharad pawar over maratha reservation)

संबंधित बातम्या:

VIDEO: संजय राऊत एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल रोज काय बोलायचं?; फडणवीसांचा टोला

तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख

(gopichand padalkar slams sharad pawar over maratha reservation)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.