भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत…

काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत...
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 11:59 PM

मुंबईः सातत्याने महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली गेली. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर ठाम राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या नंतर मात्र विरोधकांनी मोर्चा काढून त्यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे कळवले होते.

त्यामुळे आता नव्या राज्यपालांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण लाभणार याकडेच साऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे केल्यानंतर या पदासाठी आता भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

पहिले नाव आहे ओमप्रकाश माथूर यांचेय भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत. तर दुसरं नावं चर्चेत आहे ते म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे.

राजस्थानच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये येण्याआधी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

तर या दोन नावानंतर आता तिसरं एक नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचे. त्यांनी नकळत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आपल्या पालक म्हणून महाराष्ट्रात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहणार की जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.