सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक – CM एकनाथ शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. पण इतर कोणाच्या ही आरक्षणाला धक्का लावता मराठा आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. काही लोकं या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जात आहेत. जरांगे यांनी देखील याचा विचार केला पाहिजे की कोण या विरोधात कोर्टात गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी असतील. ज्यांनी जे घोटाळे केले असतील. शेतकऱ्यांशी दगाबाजी करण्याऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. शेतकरी आमचा अन्नदाता, मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे आहे. कायम उभे राहिल. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतले जाणार नाही. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. ते टिकवलं. काही लोकं याच्या विरोधात गेले आहेत. ते कोण आहेत याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी केला पाहिजे. आरक्षण रद्द व्हावे म्हणून कोण प्रयत्न करत आहे. जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिले नाही. आता आरक्षण आम्ही दिले तर ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करतंय.
कुणबी नोंदी प्रमाणपत्र देण्याचं काम शिंदे समिती करत आहे. सगसोयरेच्या बाबतीत कार्यवाही आणि आक्षेप तपासले जात आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक आहे. कुठलाही इतर समाजचे,ओबीसीचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.
‘मी गल्ली मधला मुख्यमंत्री आहे. मी एक कार्यकर्ता आहे. किसन नगर हे माझं घर आहे. इथं आल्याने मला आनंद आहे. फक्त योजना आणायच्या घोषणा करायच्या आणि सोडून द्यायच्या असं नाही. या योजनेचे पैसे माझ्या बहिणींना मिळतोय की नाही व सिलेंडर बाबत फॉर्म भरले की नाही व इतर योजना बाबत देखील आम्ही सूचना करत आहोत. एका दिवसात मी स्वतः पंधरा घरात फिरतोय आमचे आमदार खासदार कार्यकर्ते व नेते प्रत्येक जण एका दिवसात 15 घर हा अभ्यान राबवतील.’
‘विरोधकांनी अपप्रचार केला तरीसुद्धा या महिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून फॉर्म भरला. विरोधकांच्या अपप्रचाराला आमच्या बहिणी बळी पडल्या नाही. भावावर विश्वास ठेवला आणि हा भाऊ जे बोलतो तेच करतो. आमची योजना कोण बंद पाडणार, सरकार आम्ही आहे आणि ही योजना बंद नाही होणार तर चालूच राहणार.’