मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम, बोगस लसीकरण (Fake Vaccination) कार्यक्रम, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलबद्दल (Mumbai Local) केलेलं वक्तव्य, महाविकास आघाडीतील समन्वय या मुद्यावंर टीव्ही 9 मराठी शी संवाद साधला.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम, बोगस लसीकरण (Fake Vaccination) कार्यक्रम, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलबद्दल (Mumbai Local) केलेलं वक्तव्य, महाविकास आघाडीतील समन्वय या मुद्यावंर टीव्ही 9 मराठी शी संवाद साधला. टोपे यांनी यावेळी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हा आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सुरु करण्यात आला असल्याचं सागितलं. तर, मुंबई लोकलबद्दल रेल्वेशी चर्चा करायला तयार आहे मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार रेल्वेकडेच आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितंलं. (Health Minister Rajesh Tope said Maha Govt started Chief Minister health Skill Development Scheme for unemployed youth and when Mumbai local resume)

मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास योजना नेमकी कुणासाठी?

मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. कोरोनाच्या महामारी आणि संकटकाळात अनेकांचा रोजगार गेला आहे. पण, राज्य सरकारचा प्रयत्न आरोग्य क्षेत्रात रोजगाराची आणि प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या कार्यक्रमात न बेरोजगारांना मिळवून देणे हा आहे, असं राजेश टोपे म्हणाले. हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत मोफत आहे दोन ते तीन महिन्याच्या अभ्यासक्रमात दहावी-बारावीच्या पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बोगस लसीकरणासदंर्भात कारवाई सुरु

बोगस लसीकरणाच्या संदर्भात अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय. पोलिसांनी यासंदर्भातील कारवाई सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बोगस लसीकरणाचे प्रकार उघडकीस आलेत. पालिकेने यासंदर्भातली आम्हाला पूर्ण माहिती दिली तर आम्ही त्या पद्धतीने पुढची कारवाई करणार आहोत, असंही आरोग्यमंत्री म्हणाले.

मुंबई लोकल कधी सुरु होणार?

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे प्रशासनानं मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारला पुढील चर्चा करता येईल. आम्ही रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून पुढील नक्कीच या संदर्भातला विचार करू. रेल्वे सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय रेल्वे प्रशासनचं घेऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाविकासआघाडीमध्ये उत्तम समन्वय

महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचं ट्युनिंग सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ चांगलं काम करत आहे. प्रत्येक पक्षाला पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना कार्यक्रम घ्यायचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख म्हणून त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असं मला वाटतं, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

‘तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय’ असे म्हणत सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा जयंत पाटलांकडून सत्कार

शिवसेनेची सोमवारपासून ‘शिवसंपर्क मोहीम’, आघाडी-युतीची चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांनी शाखाप्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

(Health Minister Rajesh Tope said Maha Govt started Chief Minister health Skill Development Scheme for unemployed youth and when Mumbai local resume)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI