‘तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय’ असे म्हणत सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा जयंत पाटलांकडून सत्कार

"तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय, तुम्ही पुढे या", असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला.

'तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय' असे म्हणत सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा जयंत पाटलांकडून सत्कार
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 6:33 PM

मुंबई : “तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय, तुम्ही पुढे या”, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला. विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंत पाटील यांनी फोटोही काढले. (Nurses felicitated by Jayant Patil in Mumbai Parvatibai Chavan Hospital)

हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटल यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळाला.

बऱ्याचदा राजकीय नेते एखादी वेगळी कृती करुन, सामान्यांसोबत काही वेळ घालवून जनतेची मनं जिंकत असतात. आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा सत्कार करत अनेकांची मने जिंकली.

यावेळी या हॉस्पिटलच्या परिचारिका सभागृहाच्या कोपऱ्यात उभ्या राहून कार्यक्रम पाहत होत्या. त्यांच्यापैकी अनेकांना जयंत पाटील यांना भेटण्याची इच्छा होती. जयंत पाटील यांना कळताच त्यांनी परिचारिकांना स्टेजवर येण्याचे आमंत्रण दिले व त्यांचा सन्मान केला, शिवाय मंत्री पाटील यांनी त्यांच्याशी संवाददेखील साधला.

दरम्यान, पाटील यांनी यावेळी श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटल यांच्या वतीने तयार केलेल्या ऑन साईट ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे आज उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार कपिल पाटील, काँग्रेस नेते युवराज मोहिते, समीर देसाई उपस्थित होते.

पाटील यावेळी म्हणाले की, ऑक्सिजन निर्मिती प्लांट हे खऱ्या अर्थाने डॉ. सुनील चव्हाण व सचिन चव्हाण यांच्या पाठपुराव्याचे यश आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. 30 मिनिटं, 10 मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन असायचा. इतर राज्यातून ऑक्सिजनचे टँकर मागवले जायचे. आम्ही, पालकमंत्री रात्रभर टँकरची वाट पाहायचो. मला समाधान वाटतं की, श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटलने तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी कंबर कसली आहे. मी डॉक्टरांचे, नर्सेसचे आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफचे अभिनंदन करतो.

इतर बातम्या

केंद्र सरकारचं नवं सहकार खातं आणि सहकार मंत्री अमित शाहांकडून जयंत पाटलांना मोठी आशा!

एकनाथ खडसेंवरील कारवाई राजकीय आकसापोटी, जयंत पाटील यांचा आरोप

खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपकडून चिडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर; जयंत पाटलांचा आरोप

(Nurses felicitated by Jayant Patil in Mumbai Parvatibai Chavan Hospital)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.