केंद्र सरकारचं नवं सहकार खातं आणि सहकार मंत्री अमित शाहांकडून जयंत पाटलांना मोठी आशा!

जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय. तसंच शाह यांचं अभिनंदनही पाटील यांनी केलंय.

केंद्र सरकारचं नवं सहकार खातं आणि सहकार मंत्री अमित शाहांकडून जयंत पाटलांना मोठी आशा!
जयंत पाटील, अमित शाह
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 5:06 PM

मुंबई : केंद्र सरकारनं नव्या सहकार खात्याची निर्मिती केली आहे. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांकडून अपेक्षा व्यक्त केलीय. रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं. परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने त्यांच्यावर अंकुश निर्माण केला आहे त्यामुळे या जाचातून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा सहकार क्षेत्राला सोडवतील अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय. तसंच शाह यांचं अभिनंदनही पाटील यांनी केलंय. (expectations from Jayant Patil to Amit Shah regarding co-operation department)

देशातील सर्व बँकींग व्यवसायावर अन्याय होतोय. त्यासाठी पवारसाहेब यासंदर्भात 1 ते 2 दिवसात महाराष्ट्रातील आणि देशातील बँकींग सेक्टरला आणि सहकार सेक्टरला कसं संकटात आणलेलं आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शहा एक बँक चालवत होते अशी माझी माहिती आहे. नोटबंदीच्या काळात जास्त नोटा एक्स्चेंज करण्यात आल्या त्यामुळे त्यांच्या बँकेचे नाव सर्वात पुढे आले होते. त्यामुळे अमित शहा यांना सहकाराचा जास्त अनुभव आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

अमित शहा यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत

गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकारात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल. आज रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर बंधने घातली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालत आहे. त्यांची स्वायत्तता धोक्यात आणलेली आहे. या सगळ्यातून अमित शहा या सेक्टरला सोडवतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केलीय.

‘खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच केंद्रीय एजन्सीचा गैरवापर’

खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असा आरोप करतानाच खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, खडसेंच्या ईडी चौकशीवरुन भुजबळांचा भाजपवर वार

मोदींचा मास्टरस्ट्रोक, अमित शहांकडे सहकार खात्याची जबाबदारी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार?

expectations from Jayant Patil to Amit Shah regarding co-operation department

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.