Maharashtra rain : मध्य महाराष्ट्रसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय?

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातून वाहणाऱ्या वेणा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Maharashtra rain : मध्य महाराष्ट्रसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 10, 2022 | 6:17 PM

मुंबई : देशात पाच राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे. विदर्भ (Vidarbha), मध्य महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीगसडचा समावेश आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) 11 ऑगस्ट रोजी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भात 10 ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस कोसळत आहे. कर्नाटकात 11 ऑगस्ट रोजी, तेलंगणात 10 ते 14 ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात 13 व 14 ऑगस्ट रोजी पर्जन्यवृष्टी होईल. राजस्थानात 11 व 12 ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता (chances of rain) आहे.

नागपुरात काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातून वाहणाऱ्या वेणा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेणानदी देखील दुथडी भरून वाहत आहेत. वेणा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने काही गावे प्रभावित झाली आहेत. यामध्ये गुमगाव, वागधरा, जामठा, धानोली, कान्होली, कोथेवाडा, शिवमडका, सुमठाना गावांचा समावेश आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर गावातील घरातही पाणी शिरण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वर्ध्यातील कान्होलीत 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

सततच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्याच्या नदी, नाले पुन्हा ओसंडुन वाहू लागली आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला सुद्धा मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने पुराने विळखा घातला होता. दरम्यान प्रशासनाने कालच खबरदारी म्हणून 15 कुटुंबातील 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. आज सकाळपासून गावातील पाणी ओसरले असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.उर्वरित सर्व नागरिक सुरक्षित असून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने अद्यापही गावात जाणारी वाहतूक बंद आहे.

पंचनामे झाले, अद्याप मदत नाही

कान्होली या गावाला एका महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. या गावाचे दोन टप्यात पुनर्वसन झाले आहे. उर्वरित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे केल्या गेले. पण अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें