करोडोंची उलाढाल, मुंबईतील ऐतिहासिक धोबीघाट, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

धोबीघाटाला अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पाहिलं असेलच. पण, या धोबीघाटचा इतिहास काय? तो का आणि कधी बांधला गेला? धोबीघाटमधील काम कसं चालतं? किती मजूर येथे झटतात? त्यांच्या कामाचं व्यवस्थापन कसं असतं? याविषयी सर्व काही जाणून घ्या.

करोडोंची उलाढाल, मुंबईतील ऐतिहासिक धोबीघाट, जाणून घ्या संपूर्ण इतिहास
Dhobi Ghat Full History in Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 7:12 PM

आशिया खंडातील सर्वात मोठा धोबीघाट म्हणजे मुंबईच्या महालक्ष्मी येथील धोबीघाट. देशाच्याच नव्हे तर विदेशी पर्यटकांनाही या हा धोबीघाटचे विशेष आकर्षण आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळणाऱ्या मुंबईकरासांठी धोबीघाट मूलभूत गरजांपैकी एक गरज झालाय. दिवसाला सुमारे लाखो कपडे धुवून देणाऱ्या धोबीघाटाची नोंद गिनिज बुकमध्ये झालीय. मळलेले कपडे पांढरेशुभ्र करून देणाऱ्या याच धोबीघाटाला अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पाहिलं असेलच. पण, या धोबीघाटचा इतिहास काय? तो का आणि कधी बांधला गेला? धोबीघाटमधील काम कसं चालतं? किती मजूर येथे झटतात? त्यांच्या कामाचं व्यवस्थापन कसं असतं? मुंबई महापालिका धोबीघाटमधील धोबीवाल्यांकडून दर महिना भाडं का आणि कशासाठी घेते? नव्या तंत्रज्ञानाच्या युगात घरोघरी वॉशिंग मशीन्स आल्या. घरगडी, कामवाल्या महिल्या आल्या. त्यांचा या व्यवसायावर काही परिणाम झाला का? याविषयी सर्व काही जाणून घेऊ.

धोबीघाटचा इतिहास

1880 मध्ये भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यावेळी ब्रिटिश, राजे-महाराजे, पोर्तुगीज, पारसी YA समाजाचे लोक प्रतिष्ठीत मानले जात असत. हे प्रतिष्ठीत पांढरे शुभ्र कपडे घालून समाजात वावरत असत. मात्र, त्यांचे हे पांढरे शुभ्र वस्त्र दिवसभरात लगेच मळत असत. त्यामुळे ब्रिटिशांनी 1890 मध्ये धोबीघाट बांधण्याच्या कामास सुरूवात केली. हा धोबीघाट बांधून पूर्ण होण्यास पाच वर्ष लागली. बांधकाम करताना कपडे धुण्यासाठी 731 वॉश स्टोन आणि कपडे सुकवण्यासाठी जागा ठेवण्यात आली. 1895 साली धोबीघाटचे काम पूर्ण झालं आणि ऐतिहासिक धोबीघाटाची सुरूवात झाली. मुंबईत बांधलेल्या या पहिल्या धोबीघाटाची उपयुक्तता, त्याचे अफाट यश याने प्रेरित होऊन इंग्रजांनी 1902 साली कोलकाता येथे दुसरा धोबीघाट बांधला.

धोबीघाट मुंबईत नेमका कुठे?

देशभरातील पहिला असा हा मुंबईचा धोबीघाट पश्चिम रेल्वेच्या सात रस्ता चौकात महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे. पश्चिम रेल्वे तसेच महालक्ष्मी स्थानकाच्या उड्‌डाणपुलावरून दिसणारा हा धोबीघाट सर्वांनाच आकर्षित करतो. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्द झालेल्या या धोबीघाटाला भारतीय आणि विदेशी पर्यटकही भेट देतात. येथून जवळच 1977 मध्ये बांधलेले वरळीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय नेहरू केंद्र, समुद्रामध्ये असलेले मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान हाजी अली दर्गा, आणि अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले भायखळा येथील प्रसिद्ध जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रालय आहे.

धोबीघाटचं व्यवस्थापन

धोबीघाट हा दोन भागात विभागला गेला आहे. मोठा धोबीघाट येथे 631 वॉश स्टोन तर लहान धोबीघाट मध्ये 100 वॉश स्टोन असून एकूण 731 वॉश स्टोन असलेला धोबीघाटचे नियोजन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे वॉश स्टोनसाठी प्रत्येक महिन्याला मुंबई महापालिकेला प्रत्येकी 293 रूपये इतकं भाडं द्यावं लागतं. प्रत्येक वॉश स्टोन मालकाकडून ते वसूल केल जाते. वॉश स्टोन हस्तांतर करणे, धोबी घाटाची दुरुस्ती, देखभाल आणि त्या लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. सद्यस्थितीत या व्यवसायात 2 ते 3 हजार लोक काम करत आहेत. दिवसातील 14 ते 16 तास कपडे धुणे आणि सुकवण्याचं काम हे कामगार करत होते. पण, आता नवीन तंत्रज्ञानामुळे हे काम 24 तास सुरू असतं. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पहाटे 4 ते 7 या वेळेमध्ये कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी सोडतात. येथील धोबी पाण्याचा साठा करून ठेवतात. त्यांचे काम पूर्ण झाले की महापालिकेचे 16 ते 17 कर्मचारी संपूर्ण धोबीघाटाची साफसफाई करतात.

कपडे धुण्याच्या पद्धतीमध्ये बदल

धोबीघाटमध्ये पूर्वीच्या काळी दगडाचा (वॉश स्टोन) वापर करून कपडे धुतले जात होते. मात्र, काळानुसार धुलाईची पद्धत बदलली गेली. गरम पाण्याची भट्टी आणि कपडे धुण्यासाठी लागणारे हौद आजही येथे आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढली. त्यामुळे कपड्यांच्या धुलाईचे काम दगडांवर होत नव्हतं. पण, नवीन तंत्रज्ञान आल्यावर येथे कपडे धुण्याच्या मशीन्स आल्या. ज्यामुळे वेळ कमी लागतोच शिवाय कमी मनुष्यबळात जास्त काम होऊ लागलं. वॉशिंग मशीन आणि ड्रायिंग मशीनचाही वापर होताना येथे दिसतो.

धोबीघाटमध्ये करोडोंची उलाढाल

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता धोबीघाट फक्त कपडेच धुवायला येत नाहीत. तर, गारमेंटमधील नवे शर्ट, जीन्स आणि इतर कपडेही धुण्यासाठी येथे आणले जातात. कपड्यांच्या शोरुममधून एकाचवेळी दोन ते तीन ट्रक नवीन कपडे धोबीघाटमध्ये धुण्यासाठी आणले जातात. जुने कपडे धुण्यासाठी काही वेगळे धोबी आहेत. काही धोबी फक्त हॉटेल्स, हॉस्पिटल यांच्या बेडशीट धुण्याच्या ऑर्डर घेतात. महिन्याला जवळपास कोटी रूपयांची उलाढाल धोबीघाटमध्ये होत असल्याचं धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास संस्थेचे चेअरमन संदज कनोजिया यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी धोबीघाटसाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे. तिथल्या लोकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत याची माहितीही टीव्ही9 मराठीसोबत बोलताना दिली.

धोबीघाटातील धोबींच्या काय आहेत प्रमुख मागण्या?

भट्टी परिसरात धूर, दूषित हवेचे प्रमाण जास्त असते. त्याचा कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे भट्टी परिसरात चिमणी बसवण्याची धोबी यांची प्रमुख मागणी आहे. विद्युत खांबासह सौर यंत्रणा बसवण्यात यावी जेणेकरून वीज बचत होईल. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे झीरो लिक्वीड डिस्चार्ज पॉलीसी अंतर्गत ETP प्लांट बसवणे. पाणी पुर्नवापर प्लांट (water recycle palnt) बसवणे. सर्वांसाठी गॅस लाईन (MGL) बसविणे जेणेकरून भट्टीत पाणी गरम करण्यासाठी केमिकलयुक्त कपडे इ. चा वापर करणे बंद करतील. परिणामी परिसर धूरमुक्त, स्वच्छ राहून आजारपण कमी होईल.

धोबी कल्याण आणि औ‌द्योगिक विकास संस्था

धोबी कल्याण आणि औ‌द्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या संस्थेचे संस्थापक उमा शंकर मिश्रा होते. बॉम्बे प्रांत धोबी महामंडल याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी महालक्ष्मी धोबीघाट सोसायटी 1994 मध्ये रजिस्टर केली. पण, खऱ्या अर्थाने 1999 साली संस्थेचे कामकाज सुरु झाले. स्टोन धारकांना सोसायटीचे सभासद करून घेण्यासाठी त्यांना त्यांना तब्बल चार वर्ष मेहनत करावी लागली. सोसायटीचे महत्व पटवून द्यावे लागले. याचेच फलित म्हणून 26 मार्च 1999 रोजी झालेल्या पहिल्या मिटिंगला बृहन्मुंबई महानगर पालिकेचे मा. डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर आणि संबंधित विभाग प्रमुख असे सात जण हजर होते. यामध्ये वॉश स्टोनचा दर प्रति माह रुपये 150 असा ठरविण्यात आला. यात प्रतिवर्षी 10 टक्के वाढ करण्याचा ठरावही याच बैठकीत घेण्यात आला.

ग्राहकांची पहिली पसंती धोबीघाट

बाजारात मार्केटमध्ये कपड्यांचे नवनवीन ब्रँड येत आहेत. त्यामुळे काही कपड्यांना धुण्याची एक खास पद्धत आहे. नाही तर ते कापड लवकर खराब होतं. त्यामुळे घरी कपडे धुण्यापेक्षा धोबीघाट बरा असा विचार ग्राहक करतात. ड्राय क्लिनिंग, सॉफ्टनर वॉश, रंग देण्यासाठी डाईंग, अँझायर वॉश आणि डाग वगैरे काढण्यासाठी केला जाणारा ब्लिच वॉश असे धुण्याचे प्रकार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता खासगी लॉन्ड्री आहेत. मात्र, त्यांचे दर आणि धोबीघाटमधील दर यामध्ये मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे ग्राहकांची पहिली पसंती धोबीघाटालाच आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे कपडे घेण्यासाठी आणि धुवून झाल्यावर ईस्त्री करून ते पुन्हा परत देण्यासाठी त्यांचाच माणूस येतो. कमी दरात आणि कमी वेळेत अधिक सेवा मिळत असल्याने ग्राहकांनाही ते फायद्याचं ठरतं.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

2011 मध्ये 496 लोक एकाच ठिकाणी हाताने कपडे धुत असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. 2013 मध्ये जगातील सर्वात मोठी आउटडोअर लॉन्ड्री म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. धोबीघाट फिल्म शुटिंगसाठीही प्रसिद्ध आहे. याठिकाणी ‘शूटआऊट अॅट वडाळा’, अमीर खान प्रोडक्शनचा ‘धोबीघाट’ यासह अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाचे शुटींग येथे झाले आहे.

Guinness World Records Dhobi Ghat

Guinness World Records Dhobi Ghat

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.