AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मुख्यमंत्री असताना फडणवीस राणेंबद्दल काय बोलले होते ज्यावर सरदेसाईंनी आज बोट ठेवलं! ऐका, वाचा

शिवसेनेचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी नारायण राणे यांच्या भूतकाळातील काही राजकीय घटनांवर बोट ठेवलंय.

VIDEO: मुख्यमंत्री असताना फडणवीस राणेंबद्दल काय बोलले होते ज्यावर सरदेसाईंनी आज बोट ठेवलं! ऐका, वाचा
| Updated on: Mar 15, 2021 | 10:59 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी नारायण राणे यांच्या भूतकाळातील काही राजकीय घटनांवर बोट ठेवलंय. सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्यावर अपहरण आणि मर्डरचे गुन्हे असल्याचं सांगत त्यांना प्रत्युत्तर दिलं. यानंतर देवेंद्र फडणवीस त्यावेळी नेमकं काय म्हणाले होते याविषयी बरीच चर्चा रंगू लागलीय (History of criticism of Narayan Rane by Devendra Fadnavis which Varun Sardesai reffer).

वरुण सरदेसाई नेमका काय म्हणाले?

वरुण सरदेसाईनं राणेंवर अपहरण, मर्डरचे गुन्हे आहेत आणि त्याची कुंडली खुद्द फडणवीसांनी सभागृहात मांडल्याचं सांगितलंय. सरदेसाई म्हणाले, “राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही.”

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय.

फडणवीस मुख्यमंत्री असताना सभागृहात नेमके काय म्हणाले होते

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजप गुंडांचा पक्ष आहे असं कोण सांगतंय, कुणी सांगावं. मुन्ना यादवबाबत आपण बोलू. त्यांच्यावर राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यांशिवाय दुसरे कोणतेही गुन्हे नाहीत. सिंधुदुर्गमध्ये कुणावर काय काय गुन्हे आहेत हे मी सांगितलं तर मग मी पार्टी ऑफ क्रिमिनल्स कोण आहे हे लक्षात येईल. सावंतवाडीत क्राईम नंबर 9/2016 अंतर्गत कलम 137,135,143,147 आणि क्राईम नंबर 11/016 अंतर्गत कलम 143, 147, 148, 149, 353, 332, 336, 447, 448 आणि गुन्हेगारी कायदा (दुरुस्ती) 1932 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.”

यानंतर फडणवीस यांनी जाऊ द्या इतके कुठं वाचत बसता असं म्हणत “जो काच के घरों में रहते है, वह दुसरों पें पत्थर नही फेंका करते” हा डायलॉग ऐकवला.

राणेंनी असं काय बोलले होतं की फडणवीसांनी राणेंची कुंडली मांडली

नारायण राणे यांनी कोपर्डीमधील हत्या आणि बलात्कारप्रकरणी फडणवीस सरकारविरोधात जोरदार टीका केली होती. तसेच भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. राणे म्हणाले होते, “महिलांचं संरक्षण करा अशी आम्ही विनंती करणार नाही, त्यांचं संरक्षण फडणवीस सरकारला करावं लागेल, नाहीतर राजीनामा देऊन बाजूला व्हा. वर्षभरात महिलांवर 20 हजार गुन्हे झाले. सरकारने हॉटेल ताजमध्ये सरकार स्थापनेचे 100 दिवस साजरे केले आणि घोषणा केल्या, पण कोणती घोषणा पूर्ण केली?”

आता तेच राणे फडणवीस एकत्र

नारायण राणे यांनी 2018 मध्येच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांना भाजपने राज्यसभेवरही पाठवलं. त्यानंतर अनेक दिवस राणेंनी भाजप प्रवेश पुढे ढकलत राहिला आणि अखेर 15 ऑक्टोबरला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन केला.

हेही वाचा :

मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, सरदेसाईंचं उत्तर

नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ पाहा :

History of criticism of Narayan Rane by Devendra Fadnavis which Varun Sardesai reffer

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.