AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पोलीस भरतीसंदर्भात महत्वाची बातमी, भरती संदर्भात काय आहे वास्तव

Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती केली जाणार असल्याची बातमी आली. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात वास्तव मांडले आहे.

राज्यात पोलीस भरतीसंदर्भात महत्वाची बातमी, भरती संदर्भात काय आहे वास्तव
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 25, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई | 25 जुलै 2023 : राज्यात अनेक विभागात कंत्राटी भरती प्रक्रिया राबवली जाते. अगदी शिक्षकांची पदेही कंत्राटने भरली जात आहेत. त्यालाही विरोध असताना पोलीस दलातही कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आले होते. मुंबई पोलीस दलात तब्बल तीन हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय झाला असल्याचे म्हटले जात होते. ११ महिन्यांसाठी ही कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले. परंतु यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात पोलिसांच्या जागा रिक्त

गेल्या काळापासून राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली आहे. मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मागील पोलीस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलिसांना जिल्हा बदल्यांसाठी सोडले होते. त्यामुळे मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली. राज्यात पोलिसांची 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

काय म्हटले गृहविभागाने

मुंबई पोलिस दलात पोलिस भरती सुद्धा कंत्राटी स्वरुपाची होणार असल्याचे बातमी आली. ही पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची नसल्याचे गृहविभागाने म्हटले आहे. यासंदर्भात माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे.

शासनाचा निर्णय असा आहे

पोलीस दलातील प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे. पोलीस भरती करुन नियमित पोलीस होईपर्यंत मुंबईची कायदा-सुव्यवस्था वार्‍यावर सोडू शकत नाही. त्यामुळे राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ भरण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोपर्यंतसाठी आहे. नियमितत पोलीस उपलब्ध झाल्यास त्यांची सेवा घेण्यात येणार नाही, असे गृहविभागाने स्पष्ट म्हटले आहे.

भरती प्रक्रिया सुरु आहे

आधीच्या सरकारने आठ हजार शिपाई आणि वाहनचालक या पदांची भरती सुरू केली होती. भरतीप्रक्रिया निवड केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत राज्य सुरक्षा महामंडळाकडून कर्मचारी घेतले जाणार होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?