‘तेव्हा मी रडलो होतो, आता तरी गावस्करांनी क्रिकेट अकादमी सुरु करावी’, जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक ट्विट

"गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्करसाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी एवढीच इच्छा", असंही आव्हाड म्हणाले.

'तेव्हा मी रडलो होतो, आता तरी गावस्करांनी क्रिकेट अकादमी सुरु करावी', जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक ट्विट
सुनील गावस्कर आणि जितेंद्र आव्हाड

मुंबई :  मुंबईतील बांद्रास्थित म्हाडाच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. कित्येक वर्ष प्लॉट असूनही भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु केली नाही. त्यानंतर तो प्लॉट ताब्यात घेण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दाखवली. पण आता गावस्करांच्या विनंतीनुसार  सरकारने तो प्लॉट त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्या प्लॉटवर लवकरात लवकर अकादमी सुरु करावी, अशी इच्छा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खास आठवणही सांगितली आहे.

बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही. त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

आव्हाड नेमकं काय म्हणाले आहेत?

तसं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मात्र हे ट्विट करताना जर त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर हा प्लॉट मी रद्द केला असता, असं सांगायला देखील मंत्री जितेंद्र आव्हाड विसरले नाहीत.

“जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो…”

“गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्करसाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी एवढीच इच्छा”, असंही आव्हाड म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

रंगशारदा सभागृहाजवळील 21,348 चौरस फूट भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इनडोअर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी देण्यात आला होता, परंतु दरम्यानच्या 30 वर्षांत तिथे कोणतेही बांधकाम झाले नाही. डिसेंबरमध्ये प्राधिकरणाने राज्य सरकारला भूखंड परत घेण्यास सांगितला होता.

वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही.  त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

(housing minister of maharashtra Jitendra Awhad tweet About Sunil Gavaskar Over Bandra Mhada plot)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन, तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

सरकारचा अध्यादेश आगामी पोटनिवडणुकीला लागू होणार नाही? पंकजा मुंडेंनंतर नरकेंचही मोठं वक्तव्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI