AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हाडाच्या सर्वात महागड्या 5 कोटी 80 लाखांच्या घरासाठी किती अर्ज?

मुंबई:  महाराष्ट्र गृह निर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) 2018 मध्ये मुंबईत जाहीर केलेल्या लॉटरीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचा दावा, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केला आहे. इतकंच नाही तर ग्रॅन्ट रोडवरील सर्वात महागड्या घरालाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. 5 कोटी 80 लाखांच्या सर्वात महागड्या घरासाठी तब्बल 26 अर्ज आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. […]

म्हाडाच्या सर्वात महागड्या 5 कोटी 80 लाखांच्या घरासाठी किती अर्ज?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई:  महाराष्ट्र गृह निर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) 2018 मध्ये मुंबईत जाहीर केलेल्या लॉटरीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचा दावा, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केला आहे. इतकंच नाही तर ग्रॅन्ट रोडवरील सर्वात महागड्या घरालाही तुफान प्रतिसाद मिळत आहे. 5 कोटी 80 लाखांच्या सर्वात महागड्या घरासाठी तब्बल 26 अर्ज आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. म्हाडाच्या 1384 घरांसाठी आतापर्यंत एकूण 78277 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 35278 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. तर ग्रँट रोड कंबला हिल इथल्या 5 कोटी 13 लाखा रुपये किंमतीच्या घरासाठी 28 अर्ज, 4 कोटी 99 लाख किंमतीच्या घरासाठी 25 अर्ज तर 5.80 कोटी घरासाठी 26 अर्ज प्राप्त झाले आहेत.

म्हाडाचे घर मिळवून देतो असं सांगून फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावर तोडगा म्हणून म्हाडाकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. या हेल्पलाईन नंबरद्वारे  म्हाडामध्ये तक्रार करता येणार आहे. ०२२ – ६६४०५४४५  या  हेल्पलाईन नंबरवर तक्रारी करता येतील. कोणी जर म्हाडाच्या लॉटरीचे घरे देण्याचे आमिष दाखवत असेल, तर या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

तसेच, कोकण मंडळाच्या लॉटरीमधील पलावा सिटीमधील EWS, LIG विजेत्यांना जिथे ओसी मिळाली आहे, तिथे GST भरावा लागणार नाही, असंही सामंत म्हणाले.

“मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली त्याचा विचार केला जाईल, मात्र या लॉटरीच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. तसेच या पुढे होणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती कमी करण्याचा विचार नक्की करु”, असं सामंत यांनी सांगितलं.

म्हाडाकडे असलेल्या गोराई, पवई इथले 350 ट्रान्झिट घरे माहुलवासियांसाठी ‘बीएमसी’ला देणार आहोत. दोन तीनदा लॉटरी काढल्यानंतरही नाशिक, औरंगाबाद आणि इतर ठिकाणच्या घरांची विक्री झाली नाही, त्यामुळे ती घरे पोलिसांना उपलब्ध करुन देता येतील का? असा आमचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.