VIDEO: पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार; संजय राऊत कडाडले

| Updated on: Feb 19, 2022 | 4:22 PM

भाजप नेत्यांना अंगावर घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आता थेट ईडीलाच आव्हान दिलं आहे. पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.

VIDEO: पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार; संजय राऊत कडाडले
संजय राऊत कडाडले
Follow us on

मुंबई: भाजप नेत्यांना (bjp) अंगावर घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आता थेट ईडीलाच आव्हान दिलं आहे. पुढच्या आठवड्यात ईडीचा (ED) सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे. आमच्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. हजारोंच्या संख्येने आम्ही हे पुरावे घेऊन ईडीच्या कार्यालयात जाऊ. तेव्हा ईडीचं कार्यालय बंद झालेलं असेल. पुढील आठवड्यात आम्ही ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढू. आम्हाला धमकावत आहेत ना, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार… इकडे जाणार… थोडं थांबा. इथेच बसून पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा काढला जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनाही माध्यमांनी सवाल केले असता त्यांनी ईडीचा घोटाळाच बाहेर काढणार असल्याचं स्पष्ट केलं. ईडीच्या कार्यालयात आम्ही लाखो लोकं लवकर जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करताना आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले? कसा भ्रष्टाचार केला? याची माहिती देतो. करा चौकशी. आता आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही, असा संजय राऊत यांनी दिला.

इथे महाराष्ट्र सरकार आहे

कुंडल्या काढण्याच्या धमक्या देऊ नका. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्या कुंडल्या पाहाव्या लागणार आहेत. तुमच्या कुंडल्या नाहीत का? हे महाराष्ट्र सरकार आहे. असेल तुमचं केंद्र सरकार. पण इथे सुद्धा महाराष्ट्र सरकार आहे. ते व्यवस्थित आणि मजबूत आहे. आमच्या हातातही बरंच काही आहे. उगाच पोकळ धमक्या देऊ नका. त्यात तुम्हीच फसणार आहात, असा इशारा राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता दिला.

300 कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं?

यावेळी त्यांनी नारायण राणेंच्या भ्रष्टाचारावरून सोमय्यांना घेरले. तुम्हीच त्यांचा 300 कोटींचा घोटाळा बाहेर काढला होता ना. आमच्याकडेही काही कागदपत्रं आहेत तेही देतो. त्या केंद्रीय मंत्र्याचा 300 कोटीच्या घोटाळ्याची लढाई लढा. काय झालं त्या घोटाळ्याचं? तूमच्यात हिंमत असेल, तुम्ही सच्चे असाल तर तुम्ही ही लढाई पुढे न्या. तुम्ही शेपूट घालून बसले आहात या विषयावर. ती शेपूट आम्ही खेचून काढू. हे ढोंग, ही नौटंकी बंद करा. भाजपने देश आणि महाराष्ट्र लुटला आहे, ते लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करत आहात. त्याचा पर्दाफाश व्हायला आता सुरुवात झाली आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार; राणेंच्या अडचणी वाढणार?

लाव रे तो व्हिडिओः फडणवीस-सोमय्यांचा व्हिडिओ लावून विनायक राऊतांकडून राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…