AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…

आज शिवजयंती आहे. त्यानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय.

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...
अमोल कोल्हे, प्रसाद ओक
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 19, 2022 | 3:01 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : आज शिवजयंती (Shivjayanti) आहे. त्यानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिवादन केलंय. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले. चित्रपट मालिकांमध्ये ज्या कलाकारांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाराजांप्रति आदर व्यक्त केलाय. अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar), प्रसाद ओक (Prasad Oak) , शरद केळकर (Sharad Kelkar), यांनी आपल्या सोशल मीडियावरून महाराजांना अभिवादन कलंय.अमोल कोल्हे सध्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. तान्हाजी या हिंदी चित्रपटात शरद केळकरने महाराजांची भूमिका केली आहे. चिन्मय मांडलेकर याने फत्तेशिकस्त चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. प्रसाद ओकने हिरकणी या सिनेमात शिवाजी महाराजांची भुमिका साकारली आहे.

अमोल कोल्हे

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अश्यातच आज स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेचा शिवजयंती विशेष भाग दाखवला जाणार आहे. यात अमोल कोल्हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.याविषयीची पोस्ट शेअर करत अमोल कोल्हेंनी महाराजांना अभिवादन केलंय.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

शरद केळकर

अभिनेता शरद केळकर यानेही आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर करत त्यांच्या प्रतिआदर व्यक्त केला आहे.”अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा”, असं कॅप्शन शरदने आपल्या पोस्टला दिलं आहे. तान्हाजी या हिंदी चित्रपटात त्याने महाराजांची भूमिका केली आहे.

प्रसाद ओक

प्रसाद ओकनेही एक फोटो शेअर करत सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जय भवानी… जय शिवराय..!!!”, असं प्रसादने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. हिरकणी या सिनेमात प्रसादने शिवाजी महाराजांची भुमिका साकारली आहे.

चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर याने फत्तेशिकस्त चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानेही इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार शिवरायांची भूमिका, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’चा शिवजयंती विशेष भाग

शिवजयंतीनिमित्त रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा, चित्रिकरण लवकरच सुरु होणार

Poori Gal Baat Teaser : टायगर श्रॉफच्या व्हिडिओवर दिशा पटानीची भन्नाट कमेंट, म्हणाली की…!

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब