मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. टायगर अनेकदा त्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. टायगरचा म्युझिक व्हिडिओ (Video) अनबिलीवेबल 2020 मध्ये आला होता. यानंतर कॅसानोव्हा आणि नंतर देशभक्तीपर एक गाणे वंदे मातरम. यानंतर आता टायगरने त्याच्या चाहत्यांसाठी पूरी गल बातचा (Poori Gal Baat) टीझर आणला आहे. टायगर श्रॉफच्या ‘पुरी गल बात’चा टीझर आल्यापासून चाहते ते पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.