AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांची राजीनाम्याची तयारी, तर कोण असेल महाराष्ट्रात भाजपचा नवा चेहरा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. २३ पैकी फक्त ९ जागा भाजपला वाचवता आल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर भाजपचा नवा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरु झालीये.

फडणवीसांची राजीनाम्याची तयारी, तर कोण असेल महाराष्ट्रात भाजपचा नवा चेहरा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 05, 2024 | 8:28 PM
Share

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे महायुतीला आत्मचिंतन करावे लागणार आहे. राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. हे पाहता सध्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे यांना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणू शकते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महायुतीला ४५ हून अधिक जागांचा दावा करण्यात आला होता. पण त्यांना फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. २३ जागा असलेल्या भाजपला यंदा फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा तरुणांच्या नाराजीलाच सामोरे जावे लागलेय.

पंकजा मुंडे यांचा पराभव

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांच्या जवळचे धनगर नेते महादेव जानकर यांचाही पराभवाचा धक्का बसला आहे. परभणीतून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. भाजपला या दोन्ही जागांवर मोठा धक्का बसला आहे.

भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले ओबीसी नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. पण तसे अजूनही झाले नाही. त्यामुळे याचा ही फटका त्यांना बसला असावा. भाजपला या गोष्टी हाताळण्यात अपयश आले.

अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या सध्याच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर त्यांना पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. असं त्यांनी म्हटलंय.

मराठा, ओबीसी, एससी आणि एसटी समाजाने पाठ फिरवल्याने भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची फडणवीसांप्रती असलेली कटुता सर्वश्रुत आहे.

इतर मराठी भाषिक समाजही फडणवीस यांच्यावर नाराज होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे प्रादेशिक पक्ष फोडल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याने अनेक लोकं नाराज होते. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे त्यांना अनेक जागा गमवाव्या लागल्या. ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात, त्या नागपूरमध्ये भाजपला फक्त एक जागा जिंकता आली आहे. तेही नितीन गडकरींनी केलेल्या कामामुळे. काँग्रेसला येथे मोठं यश मिळालंय.

विनोद तावडे केंद्राची पहिली पसंती

आता देवेंद्र फडणवीस यांच्या जागी कोणता चेहरा पुढे येऊ शकतो याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नवा चेहरा हवा आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे केंद्राची पहिली पसंती असू शकतात. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस झालेले विनोद तावडे हे महाराष्ट्रातील पहिले नेते आहेत.

गेल्या काही वर्षांत विनोद तावडे यांना स्वतला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बिहार आणि हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी सिद्ध केली. आपली राजकीय परिपक्वता त्यांनी दाखवून दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात आता विनोद तावडे यांना चांगला अनुभव मिळाला आहे. ते स्वतः मराठा समाजातून येतात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपला सध्या सर्वाधिक गरज त्यांची भासत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा