मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खातेस्तरावर नियोजनाचे आदेश

बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसह बेस्ट कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खातेस्तरावर नियोजनाचे आदेश
corona-vaccination
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 9:20 PM

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ साठी कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह बेस्ट कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांच्या व खात्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या सर्व विभाग आणि खातेप्रमुखांना दिले आहेत. तसंच सर्व खाते प्रमुखांनी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वतः लस घ्यावी आणि त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असंही काकाणी यांनी नमूद केलं आहे.(Important meeting of BMC employees and BEST employees regarding corona vaccination)

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड लसीकरण विषय बाबींसाठी स्थापन केलेल्या ‘टास्क फोर्स’ची विशेष बैठक सोमवारी संपन्न झाली. बैठकीला मार्गदर्शन करताना काकाणी यांनी सदर आदेश दिले आहेत. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (आरोग्य) देवीदास क्षीरसागर, संचालक (आरोग्य शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी कोविड लसीकरण सध्या करण्यात येत आहे. या अनुषंगाने सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे चर्चिले गेले.

चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे आणि संबंधित आदेश

1. महापालिकेच्या सर्व विभागांच्या / खात्यांच्या स्तरावर लसीकरण सुव्यवस्थित प्रकारे व्हावे, याकरिता समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक यापूर्वीच करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक विभाग / खात्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभाग / खात्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण योग्यप्रकारे व्हावे, यासाठी सुयोग्य नियोजन करावयाचे आहे.

2. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करताना शक्यतो कार्यालयाजवळील किंवा घराजवळील लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण करवून घेण्याची व्यवस्था समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाची आहे.

3. समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील कर्मचाऱ्यांचे सॉफ्टवेअरमध्ये नोंदविलेले भ्रमणध्वनी क्रमांक योग्य असल्याची खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक बदलले असतील, त्यांच्याबाबत सुधारित भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंद करवून घ्यावयाची आहे. जेणेकरून कर्मचारी लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वीच भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत असेल ज्यामुळे लसीकरण लवकर होण्यास मदत होईल.

4. कर्मचारी संख्या अधिक असलेल्या खात्यांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण राबविले जाऊ शकते. यासाठी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांनी व समन्वय अधिकाऱ्यांनी यथोचित समन्वय साधून कार्यवाही करावी.

5. महापालिकेच्या एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक ते नियोजन खात्याच्या समन्वय अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.

6. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या ३ संधी मिळतील. सदर तीनही वेळेस कर्मचारी लसीकरण करण्यासाठी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येईल.

7. गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे.

8. ज्या कर्मचा-यांना कोविड बाधा झाली होती किंवा झाली आहे, अशा कर्मचा-यांनी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दिनांकपासून १४ दिवसानंतर लसीकरण करवून घ्यावयाचे आहे.

9. सर्व कर्मचाऱ्यांनी पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरे लसीकरण करावयाचे आहे.

10. शक्य असल्यास खाते प्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा ‘व्हाट्सअप ग्रुप’ असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल.

संबंधित बातम्या :

390 कोटींचा निधी अखेर मिळाला; नगरसेवकांचं आता ‘मिशन ऑक्टोबर’

…तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल; यशोमती ठाकूरांचा इशारा

Important meeting of BMC employees and BEST employees regarding corona vaccination

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.