अयोध्येतही सेनेची ‘डरकाळी’, पक्षाची पहिली शाखा सुरु

अयोध्येतही सेनेची ‘डरकाळी’, पक्षाची पहिली शाखा सुरु

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येत शिवेसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. अयोध्येत शिवसेनेकडे आकर्षित होऊन अयोध्यावासियांनी थेट शिवसेनेची शाखा स्थापन केली आहे. ही शाखा लक्ष्मण किल्ला परिसरात आहे. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तेथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याने संपूर्ण भारतात चर्चा रंगलेली आहे. भाजपची गोची करत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हातात घेत थेट अयोध्येत जाऊन केंद्र सरकारकडे राम मंदिर बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे तेथील स्थानिक नागरिकही शिवसेनेकडे आकर्षित झाले आहे. इतके वर्ष रखडलेला राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याने पुन्हा जिवंत झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर महाराष्ट्तून अनेक पक्षातून टीका केली जात आहे मात्र अयोध्येचे नागिरकही उद्धव ठाकरेंचे चाहते झाल्याचे दिसत आहे. अयोध्येत शिवसेनेची शाखा चालू झाल्याने आता पक्षाचे प्रस्थ या परिसरात कायम राहील अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

शिवसेना येणार या भितीने तेथील स्थानिक मुस्लिम बांधव घराला टाळे लावून दोन ते तीन दिवसांसाठी शहर सोडून गेला आहे. पण आता शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन अयोध्येत झाल्यामुळे तिथे शिवसेनेची दहशत किती राहील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI