AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा, दुपारी 12 ते 4 दरम्यान..

राज्यात उष्णतेने कहर केला. सूर्य आग ओकताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आज आहे. शक्यतो अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी घराबाहेर पडणे टाळाच.

ज्याची भीती तेच घडले, तब्बल 13 जिल्हे धोक्यात, प्रशासनाकडून मोठा इशारा, दुपारी 12 ते 4 दरम्यान..
Yellow alert
| Updated on: May 14, 2026 | 7:20 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. सूर्य आग ओकत आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 4३ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. देशभरात वातावरण बदलताना दिसत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज राज्यात मोठा अलर्ट जारी केला. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. दुपारी 12 ते 4 नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. यासोबतच जास्तीत जास्त पाणीही प्यावे. आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाकडूनही नागरिकांना सूचना देण्यात आल्यात. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमान होते. आज नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या वतीने नांदेड जिल्ह्याला 14 आणि 15 मे रोजी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नांदेडमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येलो अलर्टच्या अगोदरच्या दिवशी नांदेडचे तापमान 41 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत.

जळगावच्या ममुराबाद येथील वेधशाळेकडून 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात अडीच ते तीन अंशांनी वाढ. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले.

चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला असून आगामी काळा उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. हिट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट