India Railways: रेल्वेत जनरल क्लाससाठी स्वस्तात जेवण, 20 रुपयांत जेवणाचे पाकीट, 3 रुपयांत पाणी

India Railways: जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.

India Railways: रेल्वेत जनरल क्लाससाठी स्वस्तात जेवण, 20 रुपयांत जेवणाचे पाकीट, 3 रुपयांत पाणी
Railway
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 2:28 PM

उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अनेकांना आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.

उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशनच्या मदतीने जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरामध्ये जेवण आणि नास्ता दिला जाणार आहे. रेल्वेत परवडणारे जेवण 20 रुपयांत असणार आहे. तसेच 50 रुपयांत जेवण मिळणार आहे.

जेवणात काय असणार

सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात 20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (175 ग्रॅम), बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाणी तीन रुपयांत मिळणार

भारतीय रेल्वेने सध्या देशातील 100 रेल्वे स्थानकावर 150 इकोनॉमी मील काउंटर सुरु केले आहे. लवकरच याची संख्या वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन रुपयांत पाणी दिले जात आहे. रेल्वेच्या या सुविधेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना चांगले जेवण मिळणार आहे. उन्हाळ्यामुळे रेल्वेने विशेष रेल्वे सुरु केल्या आहेत. परंतु त्याचे आरक्षण मिळत नाही. यामुळे ही गर्दी लक्षात घेऊस सर्वसाधारण डब्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.