AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच

तौत्के चक्रीवादळामुळे बुडालेल्या 'बार्ज पी- 305'वरुन कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. (Barge P305 INS Kochi)

INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 19, 2021 | 12:08 PM
Share

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य सुरु आहे. हिरा ऑईल फील्डमधील ‘बार्ज पी- 305’ वर (Barge P305) अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकांना यश आलं. दुर्दैवाने या घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. (Indian Navy crew from Barge P305 off the coast of Mumbai rescued out of INS Kochi)

समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

तौत्के चक्रीवादळामुळे बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’वरुन कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. 17 तारखेलाच रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं होतं.

कर्मचाऱ्यांनी 11 तास समुद्राच्या पाण्यात काढले

INS कोचीवरुन 125 जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर 65 जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.

“बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी 11 तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले” असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा याने सांगितले. (Barge P305 INS Kochi)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video : तौत्के चक्रीवादळाच्या तांडवातून वाचलेले ‘मृत्यूंजय’! 24 तासापेक्षा अधिक काळ समुद्रात काढल्यानंतर वाचले प्राण

VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं

(Indian Navy crew from Barge P305 off the coast of Mumbai rescued out of INS Kochi)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.