Mumbai : इंडिगो कर्मचाऱ्यांचा अचानक संप? मुंबई विमानतळावर प्रवाशांची वाढली गर्दी; अपडेट काय?
Mumbai Airport : मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिगो एयरलाईन्सच्या कर्मचारी अचानक संपावर गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिगो एयरलाईन्सच्या कर्मचारी अचानक संपावर गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेक विमानांची उड्डाणे रखडली आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कॅबिन क्रु आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये शिफ्टबाबत वाद झाल्याने कर्मचाऱ्यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने विमानतळावर गोंधळ उडाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा अचानक संप
इंडिगो ही एक महत्त्वाची विमान कंपनी आहे. कॅबिन क्रु आणि स्टाफच्या मॅनेजमेंटमध्ये शिफ्टबाबत वाद झाल्याने कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे आता अनेक उड्डाने रखडली आहेत, तसेच अनेक विमाने रद्द देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी 2 डिसेंबरला इंडिगोच्या एका विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. हे विमान कुवेतहून हैदराबादला जात होते. मात्र या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले होते. त्यामुळे कालही काही विमानांची उड्डाने उशिराने झाली होती. त्यामुळे काल आणि आज असे सलग दोन दिवस प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
मुंबई विमानतळांवर विमानांची गर्दी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील एक प्रमुख विमानतळ आहे. मुंबई विमानतळावर दररोज अंदाजे 900 ते 950 विमाने येतात किंवा येथून उड्डाण करतात. यातील काही परदेशात जाणारी विमाने असतात तर काही विमाने ही देशातील शहरांकडे जाणारी असतात. दिवाळी किंवा नाताळाच्या काळात प्रवाशांची संख्या जास्त असताना विमानांची संख्या वाढून 1000 पेक्षा जास्त होते.
दरम्यान, इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. ही एक कमी किमतीची विमानसेवा देते. इंडिगो परवडणाऱ्या दरात चांगल्या सेवा देण्यासाठी ओळखली जाते. ही कंपनी भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शहरांना जोडते. या कंपनीची स्थापना 2005 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी केली होती.
