AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर…6 बंडखोर खासदारांविरोधात सर्वात खतरनाक प्लॅन…कुणाचा होणार गेम?

Uddhav Thackeray Big Plan: पक्षात उभी फूट पडलेली आहे. सहा खासदारांनी वेगळी चूल मांडली आहे. तर ओमराजे निंबाळकर यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. पक्षाचा अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला असताना आता उद्धव ठाकरे यांनी मोठा प्लॅन आखला आहे. कुणाचा होणार गेम?

उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर...6 बंडखोर खासदारांविरोधात सर्वात खतरनाक प्लॅन...कुणाचा होणार गेम?
उद्धव ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात
| Updated on: Jun 21, 2026 | 9:59 AM
Share

Uddhav Thackeray on six Lok Sabha constituencies of the rebel MPs: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दुफळी माजली आहे. सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्याचवेळी गेम फिरला. ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे ऑपरेशन टायगरचा फियास्को होण्याची शक्यता वाढली आहे. तर उद्धव ठाकरे सुद्धा ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी या सहाही बंडखोर खासदारांच्या मतदार संघात थेट धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे हे 26 जून ते 29 जून या कालावधीत या फुटीर खासदारांच्या मतदारासंघाचा दौरा करणार आहेत. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर जनतेचा कौल कुणाच्या बाजूने हे सुद्धा समोर येईल.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 9 लोकसभा खासदारांपैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची चर्चा आहे. त्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार असल्याचे सजते. त्यानंतर हा गट शिंदे सेनेत विलीन करण्यात येईल. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांचा झंझावती दौरा होईल.

उद्धव ठाकरे 26 जून रोजीपासून दौऱ्यावर

उद्धव ठाकरे यांचा दौरा 26 जूनपासून सुरू होईल. 27 जून यवतमाळ-वाशिम, त्यानंतर हिंगोली मतदारसंघात ते असतील. तर 28 जून रोजी परभणी आणि नंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. याशिवाय 29 जून रोजी शिर्डी मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलग चार दिवस ते बंडखोरांचा मतदारसंघ पिंजून काढतील. या मतदारसंघात पक्षाची पुनर्बांधणी करतील आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देतील. तर मुंबईत शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी मोर्चबांधणी सुरू केल्याचे समोर येत आहे. संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातही शिवसैनिक सक्रिय झाले आहेत.

तर माझा राजीनामा घ्या

सहा खासदारांनी बंडाळी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. उद्धव ठाकरे भेटत नाहीत. फोन घेत नाहीत. आमच्या समस्या, अडचणी जाणून घेत नाहीत. आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा करणे गरजेचे असताना ते मुंबईतच असतात. ते मुंबई बाहेर पडत नाहीत, असा दावा बंडखोरांकडून वारंवार करण्यात येत आहे. तर 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दाखवली. जोपर्यंत माझ्यासमोर लाखो शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी नेतृत्व करणार, लढणार, पण जेव्हा शिवसैनिक म्हणतील की आता तुम्ही थांबा, मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल